संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्र्यांनी ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि द्विपक्षीय संरक्षण संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला

Posted On: 04 JUL 2024 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2024

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 04 जुलै 2024 रोजी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस  यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.  समाजमाध्यम एक्सवरील पोस्टद्वारे, संरक्षण मंत्र्यांनी सांगितले की, “द्विपक्षीय संरक्षण सहकार्याशी संबंधित अनेक मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला तसेच हिंद-प्रशांतल्या या दोन्ही देशांमधील घनिष्ठ सहकार्यावर भर देण्यात आला.”ते पुढे म्हणाले की, “आम्ही भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला खूप महत्त्व देतो.”

दोन्ही मंत्र्यांनी सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अंतर्गत संरक्षण सहकार्यातील परिवर्तनीय प्रगतीचा उल्लेख केला  आणि नोव्हेंबर 2023 मध्ये दोन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया 2+2 मंत्रिस्तरीय संवादानंतर दोन्ही देशातील संबंधांना मिळालेल्या गतीची प्रशंसा केली. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या 2024 मध्ये जाहीर केलेल्या राष्ट्रीय संरक्षण धोरणाच्या दस्तावेजात भारताला उच्चस्तरीय  सुरक्षा भागीदार म्हटले आहे.

रिचर्ड मारलेस यांनी राजनाथ सिंह यांचे सलग दुसऱ्यांदा संरक्षण मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेच्या कार्यप्रणालीचे कौतुक देखील केले ज्यात भारतातील लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले . त्याचबरोबर भारतीय संघ  टी20 क्रिकेट विश्वचषकात जगजेत्ता झाल्याबद्दल त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे  अभिनंदन केले.

 

* * *

S.Kane/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2030712) Visitor Counter : 9