विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांनी ऑस्ट्रेलिया-भारत धोरणात्मक संशोधन निधीचे जाहीर केले परिणाम
प्रविष्टि तिथि:
04 JUL 2024 1:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2024
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग राज्यमंत्री कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन, मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ऑस्ट्रेलिया-भारत धोरणात्मक संशोधन निधीचे (ऑस्ट्रेलिया-इंडिया स्ट्रॅटेजिक रिसर्च फंडAISRF) च्या 15 व्या आवृत्तीचे परीणाम घोषित केले.
एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे या प्रतिष्ठित कार्यक्रमांतर्गत ज्या यशस्वी प्रकल्पांना निधी देण्यात आला आहे, त्यांची आज घोषणा करण्यात आली.
ऑस्ट्रेलिया-इंडिया स्ट्रॅटेजिक रिसर्च फंड (AISRF) हा द्विपक्षीय कार्यक्रम आहे जो ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील सहयोगी संशोधन प्रकल्पांना मदत करतो. दोन्ही देशांमधील वैज्ञानिक संबंध मजबूत करणे आणि संयुक्त संशोधन प्रयत्नांद्वारे समान आव्हानांना तोंड देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

यावर्षी, AISRF ने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, जैवतंत्रज्ञान, शहरी खननकर्म आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कचऱ्याचे पुन्रव्यवस्थापन अल्ट्रा-कॉस्ट सोलर आणि क्लीन हायड्रोजन तंत्रज्ञान यासह विविध विषयांमधील पाच प्रकल्पांना निधी प्रदान केला आहे. हे प्रकल्प कठोर मूल्यमापन प्रक्रियेद्वारे निवडले गेले होते, आणि ते वैज्ञानिक उत्कृष्टतेच्या सर्वोच्च मानकांची पूर्तता करतात तसेच महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्याची क्षमता त्यांत आहे, हे सुनिश्चित करतात.
निवडलेले प्रकल्प ऑस्ट्रेलियन आणि भारतीय शास्त्रज्ञांद्वारे केले जाणारे वैविध्यपूर्ण आणि अत्याधुनिक संशोधन प्रतिबिंबित करतात. या उपक्रमांमधून अमूल्य अंतर्दृष्टी आणि उपाय मिळतील अशी अपेक्षा आहे.
"जगात अनेक गुंतागुंतीच्या समस्या आहेत, राष्ट्रांमधील सहकार्याने वैज्ञानिक प्रगती वितरीत करण्यात अत्यावश्यक भूमिका बजावली आहे ज्यामुळे बदल घडून येईल. (औषधांना) दाद न देणाऱ्या जीवाणूंच्या प्रकारांपासून ते ई-कचऱ्यापर्यंत आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसह, आमची द्विपक्षीय संशोधन भागीदारी जगातील सध्या अस्तित्वात असलेल्या आणि उदयोन्मुख आव्हानांसाठी उत्तम उपाय तयार करण्यासाठी ऑस्ट्रेलियातील प्रतिभेला सामील करते, आमच्या देशातील विद्यापीठे आणि संस्था आघाडीवर राहिल्या असून त्यांच्या संशोधनामुळे जागतिक पातळीवर अनेक क्षेत्रांत संशोधन झाले आहे होते; तसेच ऑस्ट्रेलिया-भारत धोरणात्मक संशोधन निधीने गेल्या 18 वर्षांत 360 हून अधिक सहयोगी संशोधन प्रकल्प वितरित केले आहेत,”असे ऑस्ट्रेलियाचे उद्योग आणि विज्ञान मंत्री एड ह्यूसिक, यावेळी म्हणाले,
या वर्षासाठी निधी पुढील बाबीवर लक्ष केंद्रित केलेले आहे:
- मृदा कार्बन जप्तीचे निरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारीत व्यासपीठ तयार करणे.
- निरुपयोगी मोबाईल उपकरणांमधून आवश्यक धातूंची पर्यावरणपूरक पुनर्प्राप्ती करणे.
- नॅनोमटेरिअल्ससह डिझाइन केलेल्या प्रणालीद्वारे किफायतशीर सौर थर्मल डिसेलिनेशन.
- जीवाणूंच्या प्रतिकाराचा सामना करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
- सूक्ष्मजंतू संसर्ग शोधण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी प्रगत निदान आणि नाविन्यपूर्ण उपचार तंत्रज्ञान शोधून काढणे.
पंजाब रिमोट सेन्सिंग सेंटर, लुधियाना; आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, आयआयएससी बंगलोर आणि ॲबजेनिक्स लाइफ सायन्सेस प्रा. लि. पुणे, हे या निधीचे भारतीय लाभार्थी आहेत.
* * *
H.Akude/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2030647)
आगंतुक पटल : 123