संरक्षण मंत्रालय
एओसी केंद्रातील संरक्षण दल कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी अग्निपथ योजने अंतर्गत युनिट मुख्यालय कोट्यानुसार नोंदणी
Posted On:
01 JUL 2024 6:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2024
- सिकंदराबादच्या थापर स्टेडियमवर 8 जुलै 2024 पासून 8 सप्टेंबर 2024 पर्यंत अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक, अग्निवीर ऑफिस असिस्टंट/एसकेटी(केवळ एओसी पाल्यांसाठी), अग्निवीर ट्रेड्समेन इयत्ता दहावी(शेफ, विविध कामांसाठी कारागीर, धोबी) अग्निवीर ट्रेड्समेन इयत्ता आठवी(हाऊस कीपर) श्रेणी आणि असामान्य क्रीडापटू(खुला प्रवर्ग) या पदांसाठी सैन्य भरती रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
- असामान्य क्रीडापटूंनी(खुला प्रवर्ग) सिकंदराबाद येथील थापर स्टेडियममध्ये क्रीडा चाचणीसाठी पाच जुलै 2024 रोजी सकाळी 6 वाजता हजर राहणे गरजेचे आहे.
- ट्रॅक अँड फील्ड खेळांसह, खालीलपैकी कोणत्याही स्तरावर जलतरण आणि डायव्हिंग आणि वेटलिफ्टींग यापैकी कोणत्याही खेळामध्ये ज्या असामान्य क्रीडापटूंनी प्रतिनिधित्व केले आहे ते खेळाडू यामध्ये त्यांच्या प्रमाणपत्रांसह सहभागी होऊ शकतात. :-
- आंतरराष्ट्रीय स्तर. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
- राष्ट्रीय स्तर. राज्याचे वरिष्ठ /कनिष्ठ राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे आणि कोणत्याही व्यक्तिगत क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे किंवा सांघिक क्रीडा प्रकारात आठव्या स्थानापर्यंत पोहोचले आहेत.
टीप :- छाननीच्या वेळी हे प्रमाणपत्र दोन वर्षांपेक्षा जास्त जुने असता कामा नये.
- वयाचे निकष.
- अग्निवीर जीडी - 17½ ते 21 वर्षे.
- अग्निवीर टेक (एई) - 17½ ते 21 वर्षे.
- अग्निवीर ऑफिस असिस्टंट/एसकेटी- 17½ ते 21 वर्षे.
- अग्निवीर टीडीएन 10वी इयत्ता - 17½ ते 21 वर्षे.
- अग्निवीर 8वी इयत्ता - 17½ ते 21 वर्षे.
- शैक्षणिक पात्रता.
- अग्निवीर जीडी – प्रत्येक विषयात 33% गुणांसह एकूण 45% गुण मिळवून इयत्ता दहावी /मॅट्रिक उत्तीर्ण.
- टीप : लाईट मोटर व्हेईकल (LMV) वाहनचालक परवाना असलेल्या उमेदवारांना वाहनचालकाची गरज असलेल्या जागांसाठी प्राधान्य दिले जाईल.
- अग्निवीर टेक – विज्ञान विषयातील 10+2/ इंटरमिजिएट परीक्षा(पीसीएम आणि इंग्रजी) प्रत्येक विषयात 40% गुणांसह एकूण किमान 50% गुणांसह उत्तीर्ण
- किंवा
- कोणत्याही मान्यताप्राप्त राज्य शिक्षण मंडळ किंवा केंद्रीय शिक्षण मंडळाची विज्ञान विषयात 10+2 इंटरमिजिएट परीक्षा (पीसीएम आणि इंग्रजी)सह उत्तीर्ण ते एनआयओएस आणि किमान एक वर्षे मुदतीचा आवश्यक क्षेत्राशी संबंधित एनएसक्यूएफ स्तर 4 किंवा वरील आयटीआय अभ्यासक्रम
- किंवा
- इंग्रजी, गणित आणि विज्ञान या विषयात किमान 40% गुणांसह एकूण 50% गुण मिळवून 10वी/ मॅट्रिक उत्तीर्ण, त्यासोबत आयटीआयमधील दोन वर्षांचे तांत्रिक प्रशिक्षण किंवा दोन/तीन वर्षांची तंत्रनिकेतनासह मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेची पदविका
- अग्निवीर कार्यालय – कोणत्याही शाखेतील 10+2/ इंटरमिजिएट परीक्षा प्रत्येक विषयात किमान 50% गुणांसह एकूण 60 % गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक. 12वीच्या परीक्षेत इंग्रजी आणि गणित/अकाउंट्स/बुक कीपिंगमध्ये 50% गुण मिळवणे अनिवार्य.
- अग्निवीर टीडीएन- इयत्ता 10 वी साधारण उत्तीर्ण (33%).
- अग्निवीर टीडीएन – आठवी इयत्ता साधारण उत्तीर्ण (33%).
- इतर तपशीलांसाठी उमेदवार एओसी केंद्र, पूर्व मेरेडपल्ली, त्रिमुलगेरी, सिकंदराबाद(टीएस) 500015 येथे संपर्क करू शकतात. मुख्यालय एओसी केंद्र ईमेल ऍड्रेस- tuskercrc-2021[at]gov[dot]in तसेच भरती रॅलीसंदर्भात अधिक माहितीसाठी www.joinindianarmy@nic. या साईटला भेट द्या.
- ही रॅली कोणत्याही वेळी कोणत्याही कारणाशिवाय रद्द होऊ शकते/पुढे ढकलली जाऊ शकते.
* * *
S.Kane/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030079)
Visitor Counter : 70