सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग एक कोटी लोकांना जागरूक करेल आणि संपूर्ण देशभरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये 100 दिवसात नशामुक्त भारत अभियानाची अंमलबजावणी केली जाईल : डॉ. वीरेंद्र कुमार
अमली पदार्थांचे व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच नव्हे तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते: रामदास आठवले
एनएपीडीडीआर योजना आणि नशा मुक्त भारत अभियानामुळे अमली पदार्थांसाठीची मागणी कमी होईल: बी.एल. वर्मा
Posted On:
26 JUN 2024 8:44PM by PIB Mumbai
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत असलेल्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करीविरुद्ध आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त 26 जून 2024 रोजी नवी दिल्लीतल्या डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले आणि बी एल वर्मा उपस्थित होते.
या कार्यक्रमात सुमारे 700 व्यक्ती प्रत्यक्ष उपस्थित होत्या तर सुमारे एक लाखांहून अधिक व्यक्तींशी संबंधित 500 स्वयंसेवी संस्था दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.
व्यसनमुक्तीचे आव्हान पेलण्यासाठी समाजातील सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी केले.
अमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध समाजजागृती करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था आणि आध्यात्मिक संस्थांचे कौतुक त्यांनी केले. युवा पिढीमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग एक कोटी लोकांना जागरूक करेल आणि समाजाच्या सामूहिक प्रयत्नातून 100 दिवसांच्या आत नशामुक्त भारत अभियानाची देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी केली जाईल.
अमली पदार्थांचे व्यसन केवळ त्या व्यक्तीलाच नव्हे तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते, असे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. नशामुक्त भारत अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्थांनी समर्पितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. व्यसनमुक्ती केंद्रे चालवण्यासाठी या संस्थांना मंत्रालय साहाय्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री बी.एल. वर्मा यांनी आपल्या भाषणात मंत्रालयाच्या एनएपीडीडीआर(अमली पदार्थांची मागणी कमी व्हावी यासाठी राष्ट्रीय कृती आराखडा ) योजनेचे महत्त्व सांगितले. अमली पदार्थांची मागणी कमी व्हावी यासाठी नशामुक्त भारत अभियान कसे साहाय्यभूत ठरत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. अभियानाच्या यशाविषयी त्यांनी अधिक माहिती दिली.
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण सचिवांनी आपल्या भाषणात अमली पदार्थांचे सेवन आणि तस्करी विरोधातील आंतरराष्ट्रीय दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.
सुखमंच थिएटर ग्रुपच्या पथ नाट्याने अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम आणि त्याचा संपूर्ण समाजावर कसा विपरित परिणाम होतो याचे दर्शन घडवले.
***
NM/SonaliK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2028991)
Visitor Counter : 70