संरक्षण मंत्रालय
रॉयल सौदी नौदलाचे प्रशिक्षणार्थी पहिल्या प्रशिक्षण स्क्वॅड्रनमध्ये सहभागी
Posted On:
26 JUN 2024 7:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2024
रॉयल सौदी नौदलाच्या किंग फहाद नौदल अकादमीचे 76 प्रशिक्षणार्थी 24 जून रोजी कोची इथल्या दक्षिण नौदल कमांड येथे भारतीय नौदलाच्या पहिल्या प्रशिक्षण स्क्वॅड्रनमध्ये (1TS) सहभागी झाले. असे प्रशिक्षण घेणारी प्रशिक्षणार्थींची ही दुसरी तुकडी आहे. पहिल्या तुकडीचे असेच प्रशिक्षण मे- जून 2023 मध्ये झाले होते.
उद्घाटन सत्रात 1TS वरिष्ठ अधिकारी कॅप्टन अंशुल कुमार यांनी प्रशिक्षणार्थींचे स्वागत केले आणि त्यांना संबोधित करताना चार आठवड्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.
प्रशिक्षणार्थींना 1TS च्या जहाजावरील नौवहन प्रशिक्षणाचीही ओळख करून दिली जाईल.
रॉयल सौदी नौदलाच्या प्रशिक्षणार्थींचे जहाजावरील कार्यशिबिर भारतीय नौदलाच्या 107 एकात्मिक अधिकारी प्रशिक्षण अभ्यासक्रमासोबत आयोजित केले जात आहे. दोन्ही सागरी राष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींमध्ये सौहार्द आणि परस्पर सामंजस्य वृद्धिंगत करणे, हा यामागचा हेतू आहे. रॉयल सौदी नौदलाचे प्रमुख ऍडमिरल फहाद अब्दुल्ला एस एल घोफैली यांनी जानेवारी 2024 मध्ये भारताच्या अधिकृत भेटीदरम्यान दक्षिण नौदल कमांडला भेट दिली होती. दोन्ही नौदलांमधील द्विपक्षीय प्रशिक्षण सहकार्य भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील दीर्घकालीन मैत्री आणि सामायिक वचनबद्धतेची साक्ष आहे.
* * *
S.Patil/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2028877)
Visitor Counter : 76