अणुऊर्जा विभाग
azadi ka amrit mahotsav

भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता पुढील 5 वर्षांत सुमारे 70 टक्क्यांनी वाढेल असा केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांचा विश्वास


7.48 गिगावॉटची स्थापित क्षमता 2029 पर्यंत 13.08 गिगावॉट होईल: डॉ. सिंह

प्रविष्टि तिथि: 25 JUN 2024 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जून 2024

 

भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता पुढील 5 वर्षांत सुमारे 70 टक्क्यांनी वाढणार आहे, असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्लीत अणुऊर्जा विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी बोलावलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सांगितले.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात मंत्री म्हणून पुन्हा कार्यभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय, अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी बोलावलेली ही पहिली अणुऊर्जाविषयक बैठक होती.

अणुऊर्जा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीवर त्यांनी भर दिला. 7.48 गिगावॉटची स्थापित क्षमता 2029 पर्यंत 13.08 गिगावॉट होईल. ती 7 नवीन अणुभट्ट्यांसह 70 टक्क्यांहून अधिक वाढेल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी यापूर्वीच सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला आणि आगामी योजनांसाठी मार्गदर्शन केले.

विभागाला सक्षम करून ज्ञान, संसाधने आणि कौशल्याची देवाणघेवाण करून पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यासाठी एकत्रित सहयोग करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तंत्रज्ञानाच्या स्वदेशी विकासावर सिंह यांनी भर दिला. ते म्हणाले, "स्वदेशी तंत्रज्ञानाचा विकास आणि ऊर्जा सुरक्षेला प्रोत्साहन देणे हे आमचे प्राधान्य असले पाहिजे." अर्थसंकल्पीय तरतूद वाढवणे, पुढील आवृत्तीच्या तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि सहकार्य वाढवणे या आधारे या सरकारने  सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्ससह संयुक्त उपक्रमांना परवानगी दिली आहे, असे ते म्हणाले. संशोधन करण्याच्या सुलभतेवर आणि क्रियाशीलतेबद्दल बोलताना ते म्हणाले की आम्ही विज्ञानाच्या सुलभतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आण्विक तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे नागरिकांचे राहणीमान सुलभ करण्याला मान्यता देत आहोत.

कॅप्टिव्ह अणुऊर्जा निर्मितीसाठी भारत स्मॉल रिॲक्टर (बीएसआर) वापरण्यासाठी विभाग 220मेगावॉट प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर (पीएचडब्लूआर) ची रचना करत आहे, असेही त्यांनी सांगितले. डीएई भारत स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर (बीएसएमआर) 220 मेगावॉटवर देखील काम करत आहे. त्यामुळे हलक्या पाण्यावर आधारित अणुभट्ट्या कॅलेड्रियाच्या जागी प्रेशर वेसलने वापरता येतील, असे ते म्हणाले.

 

* * *

S.Patil/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2028651) आगंतुक पटल : 201
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: हिन्दी , Hindi_MP , English , Urdu , Tamil