संरक्षण मंत्रालय
वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि ढाका येथील संरक्षण सेवा कमांड अणि कर्मचारी महाविद्यालय यांच्यात सामरिक आणि परिचालन अभ्यासात करतात सहकार्य
प्रविष्टि तिथि:
24 JUN 2024 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जून 2024
वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय आणि ढाका येथील मिरपूरच्या संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाने सामरिक आणि परिचालन अभ्यास क्षेत्रात लष्करी शिक्षणाबाबत सहकार्यासाठी एक सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
ERHV.jpg)
दोन्ही महाविद्यालये तिन्ही सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना कर्मचारी आणि कमांडच्या उच्च जबाबदाऱ्यांसाठी तयार करतात. ते समान मूल्ये, प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि कार्यपद्धती सामायिक करतात आणि समान आव्हानांना तोंड देतात. त्यानुसार या महाविद्यालयांनी द्विपक्षीय प्रतिबद्धता आणखी वाढवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामंजस्य करारावर 22 जून 2024 रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या भारत भेटीदरम्यान स्वाक्षरी करण्यात आली.
R7PA.jpg)
हा सामंजस्य करार व्यावसायिक कौशल्य वाढविण्यात, धोरणात्मक घडामोडींमध्ये सखोल अंतर्दृष्टी प्रदान करण्यात, सर्वोत्तम पद्धती आणि कौशल्य सामायिक करण्यात मदत करेल.तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि प्राध्यापक सदस्यांच्या शैक्षणिक क्षमता वाढविण्यात मदत करेल. हा करार प्रशिक्षण अभ्यासक्रम, संयुक्त चर्चासत्रे, अध्यापन आदानप्रदान आणि प्रशिक्षक भेटींचे आयोजन सुलभ करण्यात मदत करेल.
* * *
S.Kane/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2028372)
आगंतुक पटल : 102