सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी आणि संलग्न क्षेत्रांच्या उत्पादन मूल्यावरील सांख्यिकी अहवाल 2024 चे प्रकाशन

Posted On: 21 JUN 2024 6:02PM by PIB Mumbai

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्याराष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने, ‘कृषी आणि संलग्न क्षेत्रांतील उत्पादन मूल्यावरील सांख्यिकी अहवाल 2024’, प्रकाशित केला.

·  हे प्रकाशन एक सर्वसमावेशक आणि अभ्यासपूर्ण दस्तऐवज असून, 2011-12 ते 2022-23 या कालावधीत कृषी, पशुधन, वनीकरण आणि मासेमारी क्षेत्रातील उत्पादनांच्या मूल्यांचे तपशीलवार तक्ते आणि विश्लेषण प्रदान करते. 

·  मंत्रालयाच्या वेबसाइटवर (https://mospi.gov.in) ‘कृषी आणि संलग्न क्षेत्रांतील उत्पादन मूल्यावरील सांख्यिकी अहवाल 2024’ हे प्रकाशन उपलब्ध आहे.

ठळक मुद्दे:

2022-23 मध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या उत्पादनाच्या एकूण मूल्यामध्ये पीक, पशुधन, वनीकरण आणि मासेमारी उप-क्षेत्रांचा वाटा अनुक्रमे 54.3%, 30.9%, 7.9% आणि 6.9% इतका होता.

छायाचित्र 1: कृषी आणि संबंधित क्षेत्रांच्या स्थिर किमतींवर आधारित सकल उत्पादन मूल्यामध्ये   कृषी, पशुधन, वनीकरण आणि मासेमारी या क्षेत्रांचा वाटा (%)

· 2022-23 मध्ये पीक उप-क्षेत्राच्या एकूण उत्पादनात 'तृणधान्ये' (27.3%) आणि 'फळे व  भाजीपाला' (28.3%) या सर्वात मोठ्या पीक उपक्षेत्रांचा एकत्रित वाटा 55% पेक्षा जास्त होता.

 

·  ‘पशुधनउप-क्षेत्राचे उत्पादन 2011-12 मधील ₹487.8 हजार कोटींवरून सातत्त्याने वाढ नोंदवत 2022-23 मध्ये ₹878.5 हजार कोटींवर पोहोचले.  2022-23 मध्ये पशुधन उप-क्षेत्राच्या उत्पादनात दूध, मांस आणि अंडी यांचा वाटा अनुक्रमे 66.5%, 23.6% आणि 3.7% इतका होता.

 

·  2022-23 मध्ये औद्योगिक लाकूड, इंधनाचे लाकूड आणि लाकूड यांची  वन उप-क्षेत्र उत्पादनाच्या एकूण मूल्यातील टक्केवारी अनुक्रमे सुमारे 68%, 20% आणि 12% इतकी राहिली.

 

·  मासेमारी आणि मत्स्यपालन उप-क्षेत्राचे उत्पादन 2011-12 मधील सुमारे ₹80 हजार कोटींवरून 2022-23 मध्ये सुमारे ₹195 हजार कोटीवर पोहोचले.

 

***

S.Kakade/R.Agashe/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2027807) Visitor Counter : 84


Read this release in: English , Urdu , Hindi