संरक्षण मंत्रालय

रिअर ॲडमिरल नेल्सन डिसोझा यांनी पुणे येथील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कमांडंट म्हणून स्वीकारला कार्यभार

Posted On: 21 JUN 2024 5:33PM by PIB Mumbai

 

रिअर ॲडमिरल नेल्सन डिसोझा यांनी एअर व्हाइस मार्शल विवेक ब्लोरिया यांच्याकडून आज पुण्यातील मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  संस्थेच्या कमांडंट पदाचा कार्यभार स्वीकारला. वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज तसेच गोव्यातील नेव्हल वॉर कॉलेजचे एक कुशल माजी विद्यार्थी असलेल्या रिअर ॲडमिरल डिसोझा यांनी मार्च 1991 मध्ये भारतीय नौदलात रुजू झाल्यापासून अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

भारतातील तिन्ही संरक्षण दलांना प्रशिक्षण देणाऱ्या प्रमुख तांत्रिक प्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या या संस्थेचे  नवीन कमांडंट म्हणून करताना  रिअर ॲडमिरलसंस्थेच्या शैक्षणिक कार्यक्रमांना अधिक बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करतील तसेच या संस्थेत सुरू असलेल्या तिन्ही संरक्षण दलांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणामध्ये संयुक्तता आणि एकात्मता साधण्याच्या प्रयत्नांना चालना देतील. मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MILIT)  या संस्थेत तिन्ही संरक्षण दलाच्या मध्यम-स्तरीय अधिकाऱ्यांना तसेच भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या देशातील सैन्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते.

रिअर ॲडमिरल नेल्सन डिसोझा यांच्या नवीन नेतृत्वाखाली अत्यंत कुशल टेक्नो-वॉरियर्स अधिकाऱ्यांना घडवणे हे मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MILIT) चे उद्दिष्ट आहे. हे प्रशिक्षित अधिकारी भारतातील सशस्त्र दलांचा भविष्यासाठीचा अभ्यासक्रम तयार करतील.

***

S.Kakade/S.Kane/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2027693) Visitor Counter : 20


Read this release in: English , Urdu , Hindi