संरक्षण मंत्रालय
"स्वतःसाठी आणि समाजासाठी योग" : भारतीय लष्कराने साजरा केला 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिन
प्रविष्टि तिथि:
21 JUN 2024 1:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2024
एकता आणि समरसतेच्या कालातीत भावनेला उजाळा देत, भारतीय लष्कराने संपूर्ण देशभरात 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला. विविध ठिकाणी आयोजित या कार्यक्रमात विविध स्थानांवर तैनात लष्करातील जवान , त्यांचे कुटुंबीय, मुले, माजी सैनिक, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. उत्तरेकडील सियाचीन हिमनदी (केंद्रशासित प्रदेश लडाख) प्रदेशात गोठवणाऱ्या उंचीवर तैनात असलेल्या सैनिकांनी तसेच कन्याकुमारी (तामिळनाडू) आणि अंदमान निकोबारच्या किनारी बेटांवरही सैनिकांनी योगासने केली. पश्चिमेकडील लोंगेवाला (राजस्थान) आणि कच्छ (गुजरात) पासून ते पूर्वेकडील किबिथू (अरुणाचल प्रदेश) आणि इंफाळ (मणिपूर) या पर्वतीय प्रदेशांमध्ये देखील योग दिन साजरा करण्यात आला.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह मथुरा या प्राचीन शहरात आयोजित योग दिन कार्यक्रमात सर्व रँकचे अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत सहभागी झाले होते. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे हे देखील यावेळी उपस्थित होते.
दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन दिल्ली कॅन्टोन्मेंट भागातील करिअप्पा परेड ग्राऊंड येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय लष्कराचे जवान, भारताचे मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या देशांचे संरक्षण कर्मचारी आपल्या कुटुंबीयांसह उपस्थित होते. राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट्स देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

भारताव्यतिरिक्त, जगभरात संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये तैनात असलेल्या सर्व भारतीय सैन्य दलांनी देखील आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. या आयोजनात स्थानिक लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आर्मी पॅरालिम्पिक नोड येथील लष्कराचे पॅरा ऍथलीट, लष्कराचे मुले/मुली क्रीडापथक कॅडेट्स यांनीही आंतरराष्ट्रीय योग दिनात मोठ्या उत्साहाने भाग घेतला.

* * *
S.Kane/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2027366)
आगंतुक पटल : 75