संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुनर्वसन महासंचालनालय (डीजीआर) च्या वतीने 21 जून, 2024 रोजी हिंडन येथील एअर फोर्स स्टेशन येथे माजी सैनिकांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन

Posted On: 20 JUN 2024 3:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2024

संरक्षण मंत्रालयाच्या पुनर्वसन महासंचालनालय (डीजीआर) तर्फे 21 जून 2024 रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन मधील एअर फोर्स स्टेशन, येथे स्टेशन ऑडिटोरियममध्ये माजी सैनिकांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्याचा उद्देश माजी सैनिक (ईएसएम) आणि नियोक्त्यांना एकमेकांशी जोडणे, तसेच माजी सैनिकांना रोजगाराच्या इतर संधी उपलब्ध करुन देणे हा आहे. देशभरातील तीनही सेनादलांचे माजी सैनिक या रोजगार मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. सुमारे 40 कंपन्या या मेळाव्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये क्षेत्रीय कामे, प्रशासकीय कामे, डेस्क जॉब, संस्थात्मक सुरक्षा आणि संबंधित कामांच्या विविध नोकऱ्या माजी सैनिकांना दिल्या जाणार आहेत.

सर्व माजी सैनिकांसाठी यासाठीची नोंदणी सकाळी 7 ते 10 दरम्यान मेळाव्याच्या ठिकाणीच होईल. नोंदणीसाठी माजी सैनिकांनी त्यांचे ईएसएम ओळखपत्र आणि नवीनतम सीव्ही किंवा बायोडेटाच्या पाच प्रतिंसह छायाचित्रांसह आणावी. त्याचबरोबर माजी सैनिकांना विविध नोकरीच्या संधी आणि सहजगत्या भरती प्रक्रियेचा लाभ मिळेल.

अधिक माहिती आणि मदतीसाठी माजी सैनिक वॉरंट ऑफिसर एस.के. सिंह (9311720898) आणि ज्युनियर वॉरंट ऑफिसर यू.सी. मोहंता (7030595754) यांच्याशी संपर्क साधू शकतात. कंपनी/कंपन्या/नियोक्ता ऑनलाइन नोंदणी करू शकतात आणि www.dgrindia.gov.in वर त्यांचे दालन बुक करू शकतात. इतर कोणत्याही शंका असल्यास ते सह संचालंक (एसई आणि सीआय), पुनर्वसन महासंचालनालय (डीजीआर), वेस्ट ब्लॉक आयव्ही, आर.के. पुरम, नवी दिल्ली-110066 यांच्याशी 011-20862542 वर संपर्क करू शकतात किंवा seopadgr@desw.gov.in, drzclkw@desw.gov.in वर ईमेल पाठवू शकतात.

 


NM/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2026995)