अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्थिक वर्ष 2024-25 साठी एकूण प्रत्यक्ष कर संकलनात 22.19% वाढीची नोंद


2024-25 साठी निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 20.99 टक्क्यांहून अधिक वाढ

Posted On: 18 JUN 2024 9:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली 18 जून 2024

2024-25 या आर्थिक वर्षासाठी (17.06.2024 पर्यंत ) प्रत्यक्ष कर संकलनाचे तात्पुरते आकडे दर्शवतात की मागील आर्थिक वर्षाच्या (म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24) संबंधित कालावधीतील 3,82,414 कोटी रुपयांच्या तुलनेत यावर्षी  निव्वळ संकलन  4,62,664 कोटी रुपये झाले असून यात 20.99% वाढ झाली आहे.

निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन 4,62,664 कोटी रुपये (17.06.2024 रोजी) असून यात कॉर्पोरेशन कर (CIT) 1,80,949 कोटी रुपये , प्रतिभूती व्यवहार करासह वैयक्तिक प्राप्तिकर 2,81,013 कोटी रुपये (निव्वळ परतावा) समाविष्ट आहे.

2024-25 या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष  करांच्या एकूण संकलनाचे तात्पुरते आकडे (परताव्यासाठी समायोजित करण्यापूर्वी) 5,15,986 कोटी रुपये आहेत  जो मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 4,22,295 कोटी रुपये होता आणि आर्थिक वर्ष 2023-24 च्या संकलनाच्या तुलनेत यात 22.19% वाढ दिसून येते.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 17.06.2024 पर्यंत 53,322 कोटी रुपये परतावा रक्कम  जारी करण्यात आली आहे जी मागील वर्षातील याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यापेक्षा 33.70% अधिक आहे.

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2026369) Visitor Counter : 103