भूविज्ञान मंत्रालय

येत्या दोन दिवसांत उप-हिमालयीन पश्चिम बंगाल तसेच आसाम-मेघालय या भागांत तीव्र ते अतितीव्र स्वरूपाचा पाउस पडण्याची आणि तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता


“येत्या 24 तासांत उत्तर भारताच्या बऱ्याच भागांमध्ये उष्णतेची लाट किंवा अतितीव्र लाट राहील आणि त्यानंतरच्या काळात उष्णतेचा प्रभाव हळूहळू कमी होईल” - भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Posted On: 18 JUN 2024 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जून 2024

नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल:

येत्या 3-4 दिवसांमध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, ओदिशा, आंध्रप्रदेशचा तटवर्ती भाग आणि बंगालच्या आखाताचा वायव्य भाग, पश्चिम बंगालमधील गंगेचा  तटवर्ती काही भाग, उप हिमालयीन पश्चिम बंगालचा उर्वरित भाग तसेच बिहार आणि झारखंडमधील काही भाग या क्षेत्रांमध्ये नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या प्रगतीसाठी पोषक  स्थिती निर्माण झाली आहे.

हवामान प्रणाली आणि अंदाज तसेच धोक्याचा इशारा :

निम्न उष्णकटिबंधीय पातळीवर आसामच्या वायव्य भागावर चक्रीवादळ घोंघावते आहे. निम्न उष्णकटिबंधीय पातळीवर बंगालच्या आखातातून वायव्य भारताकडे आग्नेयेकडून/दक्षिणेकडून सोसाट्याचे वारे अधिक प्रमाणात दिसत आहेत. त्यांच्या प्रभावामुळे:

पुढील 5 दिवसांत अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा तसेच उप हिमालयीन पश्चिम बंगालच्या क्षेत्रात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह (30 तर 40 किमी प्रती तास वेगाने) मोठ्या प्रमाणावर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे.

आजपासून 21 तारखेपर्यंत उप हिमालयीन पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालय तसेच अरुणाचल प्रदेश या भागांत तुरळक ठिकाणी तीव्र ते अतितीव्र स्वरुपाचा पाउस पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्राचा सौराष्ट्राच्या लगत असलेल्या ईशान्येकडील भागावर निम्न आणि मध्यम स्तरावर हवेची चक्राकार स्थिती  घोंघावते आहे तसेच बंगालच्या उपसागराच्या पश्चिम मध्य भागात तटवर्ती आंध्रप्रदेशला लागून असणाऱ्या भागात निम्न उष्णकटिबंधीय स्तरावर आणखी एक चक्राकार  दिसून येत आहे. त्यांच्या प्रभावामुळे: 

येत्या 5 दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा,कोकण आणि गोवा तसेच गुजरात राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

18 ते 21 जून या काळात कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात तर 20 ते 21 जून या काळात गुजरात परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.

येत्या 5 दिवसांत मध्य प्रदेशाच्या पश्चिम भागात तुरळक ठिकाणी वादळ, विजेचा कडकडाट तसेच सोसाट्याच्या वाऱ्यांसह (40 ते 60 किमी प्रती तास वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, या काळात मध्य प्रदेशाचा पूर्वेकडील भाग, विदर्भ तसेच छत्तीसगड या ठिकाणी काही ठिकाणी ते बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल.

येत्या 5 दिवसांसाठी उष्णतेची लाट, उष्ण आणि दमट हवामान तसेच उबदार रात्रीच्या संदर्भातील इशारा:

देशात उत्तर प्रदेशाच्या बहुतांश भागात 18 आणि 19 तारखेला, काही भागात 20 तारखेला, पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली या भागात 18 तारखेला, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि बिहारच्या तुरळक/काही भागांत 18 तारखेला उष्णतेची लाट किंवा अतितीव्र  लाट राहण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतरच्या काळात वरील भागांमध्ये उष्णतेची तीव्रता कमी होईल.

परिशिष्ट पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 2026273) Visitor Counter : 36


Read this release in: Urdu , English , Hindi , Bengali