सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

कौटुंबिक पातळीवरील उपभोग खर्च सर्वेक्षण (HCES) 2022 – 23 च्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणातील माहितीसाठ्याच्या वापरकर्त्यांसाठी, येत्या 19 जून 2024 रोजी नवी दिल्ली इथे परिषदेचे आयोजन

Posted On: 15 JUN 2024 12:14PM by PIB Mumbai

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (Ministry of Statistics & Programme Implementation - MoSPI) अखत्यारितील राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (The National Sample Survey Office - NSSO), 1950 मध्ये स्थापन झाल्यापासूनच, या नियमितपणे कौटुंबिक पातळीवरील उपभोग खर्च सर्वेक्षण (HCES) केले गेले आहे. अशाचप्रकारे राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने अलिकडेच ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 या कालावधीत कौटुंबिक पातळीवरील उपभोग खर्च सर्वेक्षण केले गेले. कौटुंबिक पातळीवरील दरडोई मासिक उपभोग खर्च (MPCE) तसेच या खर्चाचा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ग्रामीण तसेच शहरी क्षेत्र, आणि विविध सामाजिक - आर्थिक गटांनुसारच्या वाटणीचा / वाट्याचा अंदाज मांडणे, हा या सर्वेक्षणामागचा उद्देश होता. कौटुंबिक पातळीवरील उपभोग खर्च सर्वेक्षण 2022 - 23 पार पडल्यानंतर हाती आलेल्या निष्कर्षांविषयी वस्तुनिष्ठता मांडणारे दस्तऐवज (factsheet) 24 फेब्रुवारी 2024 रोजी प्रकाशित केली गेली होती. त्यानंतर सर्वेक्षणाचा एकक स्तरीय तपशीलवार माहितीसाठा अलिकडेच 7 जून 2024 रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. या सर्वेक्षणासंबंधीची माहिती जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने, अशा सर्वेक्षण अहवालांमधील माहितीसाठ्याच्या वापरकर्त्यांसाठी, कौटुंबिक पातळीवरील उपभोग खर्च सर्वेक्षण 2022-23 वर एकदिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. येत्या 19 जून 2024 रोजी नवी दिल्ली इथे ही परिषद होणार आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाला आपल्या सर्वेक्षणाविषयीचा सुयोग्य अभिप्रमाय मिळावा आणि त्यादृष्टीने अशा माहितीसाठ्याचे वापरकर्ते आणि भागदारकांसोबत मंत्रालयाचा परस्पर संपर्क आणि संवाद वाढावा या हेतूने ही परिषद आयोजित केली आहे. या परिषदेत सर्वेक्षणामागच्या विविध प्रमुख संकल्पना, व्याख्या, मुख्य निष्कर्ष, एकक पातळीवरील संकलीत माहितीसाठी, गुणाकांचा वापर तसेच कौटुंबिक पातळीवरील उपभोग खर्च सर्वेक्षण अंतर्गत संकलित माहितीसाठीच्या गुणवत्ता अशा व्यापक मुद्यांविषयी सादरीकरणपर मांडणी केली जाणार आहे. यानंतर प्रश्नोत्तरे आणि सर्वेक्षणातील निष्कर्षांविषयची मते परस्परांसोबत सामाईक करण्याला वाव देणारे खुल्या चर्चेचे सत्रही होणार आहे. पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. बिबेक देबरॉय हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतच राष्ट्रीय सांख्यिकी आयोग (NSC), राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) ची सुकाणू समिती, सांख्यिकीविषयक स्थायी समिती (SCoS) या आयोग आणि समित्यांचे अध्यक्ष तसेच सदस्य, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयासह इतर केंद्रीय मंत्रालये आणि विभागांचे अधिकारी, विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे पदाधिकारी, नामांकित संस्थांमधील प्राध्यापक आणि संशोधक असे असंख्य मान्यवरही या परिषदेत सहभागी होणार आहेत. अशा सर्वेक्षणांच्या माहितीसाठ्याच्या वापरकर्त्यांना परिषदेत सहभागी होण्यासाठी खुल्या नोंदणीची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे. एकूण अर्जदारांपैकी निवड झालेल्या सहभागींना ईमेलद्वारे कळवले जाणार आहे. यासोबतच ज्यांना प्रत्यक्ष परिषदेत सहभागी होता येणार नाही अशांनी युट्यूब वाहिनीवरील प्रसारणाच्या माध्यमातून या परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहनही मंत्रालयाने केले आहे.

परिषदेच्या युट्यूब वाहिनीवरील थेट प्रसारणासाठीचा दुवा : https://www.youtube.com/live/Wyk6ZOswwKg?si=ZopKVXmS67Wr8o7o  

परिषदेत सहभागी होण्यासाठी खुल्या नोंदणीअंतर्गत विनंती अर्ज करण्याचा दुवा : https://www.mospi.gov.in/announcements/data-user-conference-household-consumption-expenditure-survey-hces-be-held-19062024-le

***

S.Pophale/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025501) Visitor Counter : 43