वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मे 2024 मध्ये भारताची एकूण निर्यात 10.25% ने वाढल्याचा अंदाज ; तर एप्रिल-मे 2024 दरम्यान एकूण निर्यात 9.21% ने वाढल्याचा अंदाज

Posted On: 14 JUN 2024 9:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जून 2024


 

मे 2024मध्ये भारताची एकूण निर्यात (वाणिज्य आणि सेवा एकत्रित)  68.29 अब्ज डॉलर्स एवढी असेल असा अंदाज आहे, जी मे 2023 च्या तुलनेत 10.25 टक्क्यांनी सकारात्मक वाढ नोंदवते. एकूण आयात (वाणिज्य आणि सेवा एकत्रित) मे 2024 साठी 79.20 अब्ज डॉलर्स राहील असा अंदाज आहे  जी  मे 2023 च्या तुलनेत 7.95 टक्क्यांनी सकारात्मक वाढ नोंदवते.

आकृती 1: मे 2024 मधील एकूण व्यापार*

एप्रिल-मे 2024 दरम्यान भारताची एकूण निर्यात 9.21 टक्क्यांनी सकारात्मक वाढ नोंदवून 133.61 अब्ज डॉलर्स इतकी असल्याचा  अंदाज आहे. एप्रिल-मे 2024 दरम्यान एकूण आयात 9.93 टक्के वाढ नोंदवत   149.92 अब्ज डॉलर्स एवढी असल्याचा अंदाज आहे.

तक्ता 2: एप्रिल-मे 2024 दरम्यान व्यापार*

 

April-May 2024

(USD Billion)

April-May 2023

(USD Billion)

Merchandise

Exports

73.12

69.57

Imports

116.01

106.54

Services*

Exports

60.49

52.77

Imports

33.91

29.84

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

133.61

122.35

Imports

149.92

136.38

Trade Balance

-16.31

-14.03

आकृती 2: एप्रिल-मे 2024 दरम्यान एकूण व्यापार*

वाणिज्य व्यापार

मे 2024 मधील वाणिज्य निर्यात मे 2023 मधील 34.95 अब्ज डॉलर्सच्या  तुलनेत  38.13 अब्ज डॉलर्स होती.

मे 2023 मधील  57.48 अब्ज डॉलर्सच्या  तुलनेत मे 2024 मध्ये वाणिज्य  आयात 61.91 अब्ज डॉलर्स होती.

आकृती 3: मे 2024 मधील वाणिज्य  व्यापार

एप्रिल-मे 2024 मधील वाणिज्य निर्यात एप्रिल-मे 2023 मधील  69.57 अब्ज डॉलर्सच्या  तुलनेत 73.12 अब्ज डॉलर्स होती.

एप्रिल-मे 2024 या कालावधीत वाणिज्य आयात  116.01 अब्ज डॉलर्स  होती, तर एप्रिल-मे 2023 मधील आयात 106.54 अब्ज डॉलर्स होती.

एप्रिल-मे 2024 दरम्यान वाणिज्य  व्यापार तूट 42.89 अब्ज डॉलर्स  होती तर एप्रिल-मे 2023 दरम्यान ती 36.97 अब्ज डॉलर्स होती.

आकृती 4: एप्रिल-मे 2024 दरम्यान वाणिज्य व्यापार

• मे 2023 मधील  26.27 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत मे 2024 मध्ये बिगर -पेट्रोलियम आणि बिगर -रत्ने आणि आभूषणांची निर्यात  28.60 अब्ज डॉलर्स  होती.

• मे 2024 मध्ये बिगर -पेट्रोलियम, बिगर -रत्ने आणि आभूषण (सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) आयात मे 2023 मधील 36.31 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत  36.59 अब्ज डॉलर्स  होती.

आकृती 5: मे 2024 मधील पेट्रोलियम आणि रत्ने व आभूषणाव्यतिरिक्त व्यापार

• एप्रिल-मे 2024 मध्ये बिगर -पेट्रोलियम आणि बिगर -रत्ने आणि आभूषणांची  निर्यात 54.71 अब्ज डॉलर्स होती, जी एप्रिल-मे 2023 मध्ये  52.05 अब्ज डॉलर्स होती.

• एप्रिल-मे 2024 मध्ये बिगर -पेट्रोलियम, बिगर -रत्ने आणि आभूषणे  (सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) आयात 69.31 अब्ज डॉलर्स होती, जी  एप्रिल-मे 2023 मध्ये  68.44 अब्ज डॉलर्स होती.

आकृती 6: एप्रिल-मे 2024 दरम्यान पेट्रोलियम आणि रत्ने व आभूषणे वगळता व्यापार

सेवा व्यापार

• मे 2024मध्ये सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य  30.16 अब्ज डॉलर्स होते जे मे 2023 मध्ये 26.99 अब्ज डॉलर्स होते.

• मे 2024 मध्ये सेवा आयातीचे अंदाजे मूल्य 17.28 अब्ज डॉलर्स होते जे मे 2023 मध्ये  15.88 अब्ज डॉलर्स होते.

आकृती  7: मे 2024 मधील  सेवा व्यापार*

• एप्रिल-मे 2024 दरम्यान सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य  60.49 अब्ज डॉलर्स होते जे एप्रिल-मे 2023 मध्ये 52.77 अब्ज डॉलर्स होते.

• एप्रिल-मे 2024 दरम्यान सेवा आयातीचे अंदाजे मूल्य  33.91 अब्ज डॉलर्स होते जे एप्रिल-मे 2023 मध्ये 29.84 अब्ज डॉलर्स होते.

• एप्रिल-मे 2024 दरम्यान सेवा व्यापार अधिशेष एप्रिल-मे 2023 मधील 22.94 अब्ज डॉलर्सच्या  तुलनेत 26.58 अब्ज डॉलर्स होते.

 
S.Patil/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2025426) Visitor Counter : 184


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil