संरक्षण मंत्रालय
राजनाथ सिंह यांनी सलग दुसऱ्यांदा संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर विशाखापट्टणम लगतच्या पूर्व किनारपट्टीवरील भारतीय नौदलाच्या परिचालन सज्जतेचा घेतला आढावा
Posted On:
14 JUN 2024 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2024
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 14 जून 2024 रोजी भारतीय नौदलाच्या परिचालन सज्जतेचा आढावा घेण्यासाठी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथील पूर्व नौदल कमांडला भेट दिली आणि आयएनएस जलाश्व मधून सागर भ्रमंती ('डे ॲट सी' ) केली. सलग दुसऱ्यांदा संरक्षण मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राजनाथ सिंह यांचा हा पहिलाच दौरा होता.
'डे ॲट सी' दरम्यान,संरक्षण मंत्र्यांनी भारतीय नौदलाची लढाऊ क्षमता आणि सज्जता प्रदर्शित करणाऱ्या कमांडची विविध जहाजे, पाणबुडी आणि विमानांच्या गतिशील परिचालनाचे निरीक्षण केले. त्यांच्यासोबत नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, ईस्टर्न नेव्हल कमांड व्हाईस ॲडमिरल राजेश पेंढारकर होते.
ईस्टर्न फ्लीटचे अधिकारी आणि खलाशी यांच्याशी संवाद साधताना, राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलाच्या परिचालन सज्जतेचे आणि हिंद महासागर क्षेत्रामध्ये प्रथम प्रतिसाद देणारे दल ठरल्याबद्दल कौतुक केले. “कोणताही देश हिंद-प्रशांत क्षेत्रात दुसऱ्याला दडपून टाकणार नाही किंवा आर्थिक सामर्थ्य किंवा लष्करी सामर्थ्याच्या आधारावर आपली धोरणात्मक स्वायत्तता धोक्यात आणणार नाही याची खात्री आपले नौदल देते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्षेत्रामधील सर्वांची सुरक्षा आणि विकास (SAGAR) या दृष्टीकोनाशी हे सुसंगत आहे , ज्यामध्ये या प्रदेशातील आपले मित्र देश सुरक्षित राहतील आणि एकमेकांच्या प्रगतीच्या मार्गावर एकत्र पुढे वाटचाल करतील,” असे ते म्हणाले.
सनराईज फ्लीटच्या ताफ्यासह पारंपारिक बारखान्याने ‘डे ॲट सी’चा समारोप झाला. तत्पूर्वी, आयएनएस देगा, विशाखापट्टणम येथे आगमन झाल्यावर, संरक्षण मंत्र्यांना 50 जणांनी मानवंदना दिली आणि त्यांचे समारंभपूर्वक औपचारिक स्वागत करण्यात आले.
S.Patil/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2025357)
Visitor Counter : 116