सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयुष संदर्भातल्या सर्वेक्षणाचे (जुलै 2022 ते जून 2023) निष्कर्ष जारी

Posted On: 13 JUN 2024 9:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2024

मुख्य निष्कर्ष

  • ग्रामीण भागातील सुमारे 95% तर शहरी भागातील सुमारे 96% नागरिकांना आयुषविषयीची माहिती आहे.
  • ग्रामीण भागातील सुमारे 85% कुटुंबांमधील, तर शहरी भागातील सुमारे 86% कुटुंबांमधील किमान एका सदस्याला  औषधी वनस्पती / घरगुती उपचार पद्धती / स्थानिक आरोग्यविषयक परंपरा / पारंपरिक औषधोपचार पद्धतींविषयीची माहिती आहे.
  • मागील 365 दिवसांमध्ये ग्रामीण भागातील सुमारे46%  आणि शहरी भागातील सुमारे 53% व्यक्तींनी आजार प्रतिबंधासाठी तसेच उपचारांसाठी आयुषअंतर्गच्या     उपचारपद्धतींचा वापर केला आहे.
  • ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागांत आयुर्वेद ही सर्वात जास्त उपयोगात आणली जाणारी उपचारपद्धती आहे.
  • साधारणतः शारिरिक व्याधी नुकसानीनंतर प्रकृती पूर्ववत  होण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून आयुष उपचारपद्धती प्रामुख्याने वापरली जात आहे.

सर्वेक्षणाविषयी

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या 79 व्या फेरीचा भाग म्हणून यंदा पहिल्यांदाच आयुषवरील पहिलेच विशेष अखिल भारतीय सर्वेक्षण केले गेले. जुलै 2022 ते जून 2023 या कालावधीत हे सर्वेक्षण पार पडले. या सर्वेक्षणाअंतर्गत अंदमान आणि निकोबार बेटांवरील काही अति दुर्गम गावे वगळता संपूर्ण भारतीय संघराज्य क्षेत्रात  सर्वेक्षणाची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यासाठी ग्रामीण भागातील 1 लाख 4 हजार 195 आणि शहरी भागातील 77 हजार 103 अशा एकूण 1 लाख 81 हजार 298 कुटुंबांकडून माहिती संकलित केली गेली.

खाली नमूद केल्याप्रमाणे माहितीचे संकलन करण्याच्या व्यापक उद्देशाने हे सर्वेक्षण केले गेले:

  • पारंपारिक आरोग्य सेवा पद्धतींबद्दल (आयुष औषध पद्धती) नागरिकांमधली जागरुकता
  • आजारांना प्रतिबंध तसेच आजारांवरील उपचारांसाठी आयुष उपचारपद्धतींचा प्रत्यक्ष उपयोग,
  • देशभरातील कुटुंबांमध्ये घरगुती उपचारपद्धती, औषधी वनस्पती, स्थानिक आरोग्यविषयक परंपरा/ पारंपरिक औषधे यांविषयी असलेली जागरुकता

याशिवाय या सर्वेक्षणाअंतर्गत आयुष औषधोपचार पद्धतीचा वापर करण्यासाठी  कुटुंबाला येणाऱ्या खर्चाविषयीची माहितीही या सर्वेक्षणाअंतर्गत संकलित करण्यात आली आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल आणि निष्कर्ष (वस्तुस्थिती मांडणाऱ्या दस्तऐवजांसह एकक पातळीवरील माहिती ) मंत्रालयाच्या www.mospi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (http://www.mospi.gov.in)

 

 

 

 

N.Chitale/T.Pawar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2025195) Visitor Counter : 73