रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

वैध मोटार वाहन थर्ड पार्टी इन्शुरन्स शिवाय रस्त्यांवर गाडी चालवणे हा दंडनीय गुन्हा

Posted On: 11 JUN 2024 8:49PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 11 जून 2024

मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 146 नुसार भारतीय रस्त्यांवर धावणाऱ्या मोटार वाहनांसाठी तृतीय  पक्षाच्या जोखमींचा समावेश असलेली विमा पॉलिसी काढणे अनिवार्य आहे. ही कायदेशीर तरतूद आहेच शिवाय  मोटर थर्ड पार्टी विमा संरक्षण असणे  जबाबदार रस्ता वापरकर्ता असण्याचा एक महत्वपूर्ण पैलू आहे कारण यामुळे अपघात किंवा नुकसानाच्या बाबतीत पीडितांना मदत मिळू शकते.  

जे लोक वैध मोटर थर्ड पार्टी इन्शुरन्स शिवाय विमा रहित  चालवतात किंवा चालवण्याची परवानगी देतात त्यांना कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कारावासासह दंडात्मक कारवाई होऊ शकते.

असे गुन्हेगार मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 196 अंतर्गत शिक्षेस पात्र आहेत:

• पहिला गुन्हा: तीन महिन्यांपर्यंत कारावास, किंवा रु. 2,000 दंड किंवा दोन्ही;

• त्यानंतरचा गुन्हा: तीन महिन्यांपर्यंत कारावास, किंवा रु. 4,000 चा दंड किंवा दोन्ही.

वाहन मालकांनी त्यांच्या संबंधित मोटार वाहनांच्या मोटर थर्ड पार्टी इन्शुरन्सची स्थिती तपासणे आवश्यक आहे. आधी या प्रकारचा विमा उतरवला नसेल तो लवकरात लवकर मिळवणे/ आणि आधी उतरवला असेल तर त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे.

वैध विम्याशिवाय जी वाहने रस्त्यावर धावताना आढळतील अशा वाहनांवर अंमलबजावणी अधिकारी वर नमूद केलेली कारवाई करू शकतात.

 

S.Kane/P.Jambhekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2024435) Visitor Counter : 51