राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

मॉरिशसच्या पंतप्रधानांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली

प्रविष्टि तिथि: 10 JUN 2024 8:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,10 जून 2024

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ यांनी आज (10 जून, 2024) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

राष्ट्रपती मुर्मू यांनी या वर्षारंभी मार्चमध्ये मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या मॉरिशसच्या सफल दौऱ्याची आणि मॉरिशसचे नेते आणि नागरिकांशी साधलेल्या संवादाची आठवण सांगितली.

व्हिजन सागर आणि हिंद महासागर क्षेत्रातील शांतता, सुरक्षा आणि विकासाचा सामायिक दृष्टिकोन पुढे नेण्यासाठी आमची बांधिलकी असून  मॉरिशस हा हिंद महासागर क्षेत्रात भारताचा महत्त्वाचा सागरी भागीदार असल्याची पुष्टी त्यांनी केली.

उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये नोंदवलेल्या प्रभावी प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि अनोखी आणि बहुआयामी अशी भारत-मॉरिशस भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी एकत्र काम करणे सुरू ठेवण्यास सहमती दर्शवली.

 
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2023829) आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Punjabi , Tamil