वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय गुणवत्ता परिषदेने भारतभरातील 20 शहरांमध्ये साजरा केला जागतिक अधिस्वीकृती दिवस

Posted On: 10 JUN 2024 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,10 जून 2024

भारतीय गुणवत्ता परिषदेने भारतातील 20 पेक्षा जास्त शहरांमध्ये जागतिक अधिस्वीकृती दिवस साजरा केला.‘अधिस्वीकृतीः उद्याचे सक्षमीकरण करताना आणि भविष्याला आकार देताना’ या संकल्पनेसह दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे डीपीआयआयटी चे सचिव राजेश कुमार सिंग यांनी उद्घाटन केले. नवी  दिल्ली एम्सचे संचालक डॉ.एम.श्रीनिवास,भारतीय गुणवत्ता परिषदेचे अध्यक्ष जक्सय शाह यांच्यासह उद्योगातील विविध नेते, सरकारी कर्मचारी आणि कंपन्यांचे प्रमुख या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी सर्व क्षेत्रांमध्ये जीवनाला आकार देण्यात अधिस्वीकृतीच्या भूमिकेबाबत विचारमंथन केले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना राजेश कुमार सिंग यांनी नेहमीच्या चाकोरीतल्या पद्धतींच्या पलीकडे जाण्याच्या गरजेवर आणि इतरांपेक्षा आपला स्वतःचा वेगळेपणा सिद्ध करण्याच्या पद्धती विकसित करण्यावर भर दिला. अधिस्वीकृती संस्थेला आणि एकंदर दर्जा प्रणालीला बळकटी देणे ही केवळ एक गरज नसून उत्कृष्टतेच्या दिशेने टाकलेले एक धोरणात्मक पाऊल देखील आहे, असे ते म्हणाले.

भारत सरकारने 1997 मध्ये स्थापन केलेली भारतीय गुणवत्ता परिषद ही विविध क्षेत्रातील गुणवत्ता  सुधारणा करणारी आणि त्या संबंधित सर्व विषयांवर सरकार आणि इतर हितधारकांना सल्ला देणारी तृतीय पक्ष राष्ट्रीय अधिस्वीकृती प्रणाली प्रस्थापित करणारी आणि तिचे परिचालन करणारी देशातील सर्वोच्च संघटना आहे.

 
N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2023822) Visitor Counter : 85


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu