कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गांबियाच्या सनदी अधिकाऱ्यांसाठी  दोन आठवड्यांचा चौथा मध्य करिअर प्रशिक्षण कार्यक्रम नवी दिल्लीत यशस्वीरित्या संपन्न

Posted On: 08 JUN 2024 2:28PM by PIB Mumbai

 

भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या  सहकार्याने गांबियाच्या मध्य-स्तरीय सनदी अधिकाऱ्यांसाठी दोन आठवड्यांचा चौथा मध्य -करिअर प्रशिक्षण कार्यक्रम 7 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे यशस्वीरित्या पूर्ण झाला. या कार्यक्रमाला गांबियातील प्रमुख मंत्रालयांचे प्रतिनिधित्व करणारे 30 अधिकारी उपस्थित होते.  या कार्यक्रमात कार्मिक प्रशासन आणि प्रशासन 2019-24 संबंधी  भारत गांबिया सामंजस्य कराराची यशस्वी अंमलबजावणी झाली.

समारोप सत्रादरम्यान, प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी  विभागाचे सचिव आणि राष्ट्रीय सुशासन केंद्राचे महासंचालक  व्ही. श्रीनिवास यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले आणि त्यांनी सहभागींचे अभिनंदन देखील केले.  कार्मिक प्रशासन आणि प्रशासन 2019-24 संदर्भात भारत-गांबिया दरम्यान  पाच वर्षांच्या सामंजस्य कराराच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. डिजिटल परिवर्तनामुळे आर्थिक विकासाला कशी चालना मिळू शकते, सेवा वितरण वाढू शकते आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देऊ शकते हे व्ही. श्रीनिवास यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले.  श्रीनिवास यांनी प्रशासन प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यासाठी, पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि सार्वजनिक प्रशासनात कार्यक्षमता वाढवण्यासाठी डिजिटल साधने आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या महत्त्वावर भर दिला.

"दोन्ही देशांमधील प्रशासनिक व्याप्ती वाढविण्यासाठी परस्पर ज्ञानाची देवाणघेवाण करणे महत्त्वाचे आहे." असे व्ही. श्रीनिवास म्हणाले. गांबियामध्ये भारताच्या सुशासन मॉडेल्सचा अवलंब केल्याने मोठ्या प्रमाणावर विकास कसा होऊ शकतो आणि दोन्ही देशांना आपल्या प्रगतीसाठी याचा फायदा होईल यावरही त्यांनी भर दिला.

कार्यक्रमादरम्यान, गांबियातील सनदी  अधिकाऱ्यांनी डिजिटल गांबिया, गांबियातील महिला सक्षमीकरण आणि गांबियातील सामाजिक कल्याण योजना या विषयांवर सादरीकरणे केली.  या सादरीकरणांना प्रतिनिधींनी भरभरून दाद दिली.  महिला सक्षमीकरण या विषयावरील उत्कृष्ट सादरीकरणासाठी गट दोनने प्रथम क्रमांक मिळवला.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2023592) Visitor Counter : 71