अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि कतार यांच्या संयुक्त गुंतवणूक कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत संपन्न

Posted On: 06 JUN 2024 7:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 जून 2024

 

भारत आणि कतार यांच्या नेतृत्वांनी मांडलेल्या दृष्टीला अनुसरून आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त गुंतवणूक कृती दला- (जेटीएफआय) ची पहिली बैठक आज नवी दिल्ली इथे पार पडली.

या कृती दलाचे संयुक्त अध्यक्षपद केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या वित्त व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ आणि कतारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे उपसचिव मोहम्मद बिन हसन अल्-मल्की यांनी भूषवले.

दोन्ही देशांच्या वाढ आणि समृद्धीसाठी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याकरता, पायाभूत सुविधा, ऊर्जेपासून ते तंत्रज्ञान व नवोन्मेषाला चालना देणाऱ्या विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणुकींच्या संधी लक्षात घेऊन दोन्ही देशांची एकत्रित क्षमता वापरून वाढीला गती देण्याकरता हे संयुक्त कृती दल वचनबद्ध असल्याबाबत या बैठकीत पुनरुच्चार करण्यात आला.

दोन्ही देशांची सर्वसमावेशी विकासाची समान दृष्टी, समान मूल्ये आणि उद्दीष्टे लक्षात घेऊन ‘जेटीएफआय’ने भारत आणि कतार यांच्यातील आर्थिक संबंध बळकट असण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

 

* * *

S.Kane/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2023297) Visitor Counter : 101