संरक्षण मंत्रालय
भारत आणि ओमानच्या नौदल अधिकाऱ्यांदरम्यान 6व्या चर्चासत्राचे आयोजन
Posted On:
06 JUN 2024 5:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2024
सागरी क्षेत्रात भारत आणि ओमानमधील विद्यमान संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यासाठी, भारतीय नौदल (आयएन) आणि ओमानच्या रॉयल नौदल (आरएनओ) अधिकाऱ्यांदरम्यान 6 व्या चर्चासत्राचे आयोजन नवी दिल्ली येथे 4 ते 5 जून 24 दरम्यान करण्यात आले होते.
आरएनओ च्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कार्यान्वयन आणि नियोजन महासंचालक, कोमोडोर जसीम मोहम्मद अली अल बालुशी यांनी केले. तर कमोडोर मनमीत सिंग खुराना, कमोडोर (एफसी) यांनी भारतीय नौदलाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. उभय नौदल अधिकाऱ्यांदरम्यान चर्चेची मालिका म्हणजे दोन ऐतिहासिक सागरी शेजारी देशांमधील मजबूत द्विपक्षीय संबंधांचे द्योतक आहे.
नौदल अधिकाऱ्यांच्या चर्चासत्रादरम्यान, सागरी परस्पर कार्यक्षमता वाढवण्याची आवश्यकता असलेल्या सामायिक सागरी सुरक्षा आव्हानांवर उभय बाजूंनी चर्चा झाली तसेच परिचालन सहयोग, माहितीची देवाणघेवाण, सागरी क्षेत्रातील जागरूकता, प्रशिक्षण, हवामानशास्त्र, जल आलेखनशास्त्र (हायड्रोग्राफी) आणि तांत्रिक सहाय्य या मुद्द्यांवर चर्चा झाली.
शिष्टमंडळाने माहिती एकत्रीकरण केंद्र-हिंद महासागर क्षेत्र (आयएफसी-आयओआर), गुरुग्रामला देखील भेट दिली आणि भारतीय नौदल उपप्रमुख व्हाईस ऍडमिरल तरुण सोबती यांची भेट घेतली.
ओमान हा आखाती प्रदेशातील भारताचा सर्वात निकटचा भागीदार आहे आणि नौदल सहकार्य मजबूत करण्यात आणि दोन्ही नौदलांमधील विद्यमान भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी अशा चर्चेचे नियमित आयोजन महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
* * *
S.Kane/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2023257)
Visitor Counter : 89