इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मेईटीच्या सचिवांनी केले स्वदेशी एअर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टम आणि एअर-प्रवाह ॲपचे उद्घाटन

Posted On: 05 JUN 2024 8:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 जून 2024

 

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (मेईटी) सचिव एस कृष्णन यांनी आज हवेच्या दर्जावर  देखरेख ठेवणाऱ्या देशात विकसित  प्रणालीचे (एक्यू- एम्स) आणि एअर प्रवाह ॲपचे उद्घाटन केले.  

विविध पर्यावरणीय मंजुऱ्या देण्यासाठी ही विकसित प्रणाली उपयुक्त ठरेल, असे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने म्हटले आहे.

ही प्रणाली किफायतशीर असून मेक इन इंडिया अंतर्गत उद्योगांच्या गरजेनुसार तीन प्रकारात उपलब्ध आहे. तिची संपूर्ण चाचणी घेण्यात आली असून हवेच्या विविध परिमाणांच्या कसोटीवर ती उतरल्याची माहिती कृष्णन यांनी यावेळी दिली.

उद्योगांच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी उत्पादन विकासात परिपूर्णता आणण्यासाठी मेईटी संशोधन आणि विकास कामांना पाठबळ देत आहे, असे मेईटीचे अतिरिक्त सचिव भुवनेश्वर कुमार यांनी सांगितले. 

Inauguration of AQ-AIMS

Launch of Air-Pravah app

MeitY inaugurated the Indigenous Air Quality Monitoring System (AQ-AIMS) and  launched Air-Pravah App  on the occasion of World Environment Day

 

* * *

S.Kakade/P.Jambhekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2022937) Visitor Counter : 117


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil