कृषी मंत्रालय
बागायती पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनाबाबतचा 2023-24 वर्षासाठी दुसरा आगाऊ अंदाज
Posted On:
04 JUN 2024 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2024
कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने राज्ये/केंद्रशासित प्रदेश आणि इतर सरकारी स्रोत संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संकलित केलेल्या विविध बागायती पिकांचे क्षेत्र आणि उत्पादनाबाबतचा 2023-24 वर्षासाठी दुसरा आगाऊ अंदाज प्रसिद्ध केला आहे.
एकूण फलोत्पादन
|
2022-23
|
2023-24
(पहिला आगाऊ अंदाज)
|
2023-24
(दुसरा आगाऊ अंदाज)
|
क्षेत्रफळ (दशलक्ष हेक्टरमध्ये)
|
28.44
|
28.77
|
28.63
|
उत्पादन (दशलक्ष टन मध्ये)
|
355.48
|
355.25
|
352.23
|
वर्ष 2023-24 चे ठळक मुद्दे (दुसरा आगाऊ अंदाज)
- वर्ष 2023-24 मध्ये देशातील फलोत्पादन उत्पादन (दुसरा आगाऊ अंदाज) सुमारे 352.23 दशलक्ष टन राहील असा अंदाज आहे, जे वर्ष 2022-23 (अंतिम अंदाज) च्या तुलनेत सुमारे 32.51 लाख टन (0.91%) कमी आहे.
- फळे, मध, फुले, लागवड केलेली पिके, मसाले आणि सुगंधी आणि औषधी वनस्पतींच्या उत्पादनात 2023-24 (अंतिम अंदाज) मध्ये वाढ दिसून आली आहे, तर भाजीपाल्यांमध्ये घट झाली आहे.
- केळी, लिंबूवर्गीय/लिंबू, आंबा, पेरू आणि द्राक्षे यांच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे फळांचे उत्पादन 112.63 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, सफरचंद आणि डाळिंबाचे उत्पादन वर्ष 2022-23 च्या तुलनेत कमी होण्याची शक्यता आहे.
- भाजीपाला उत्पादन सुमारे 204.96 दशलक्ष टन होण्याची कल्पना आहे. दुधीभोपळा, कारली, कोबी, फ्लॉवर, भोपळा, टॅपिओका, गाजर आणि टोमॅटोच्या उत्पादनात वाढ अपेक्षित आहे, तर कांदा, बटाटा, वांगी आणि इतर भाज्यांच्या उत्पादनात घट अपेक्षित आहे.
- वर्ष 2023-24 (दुसरा आगाऊ अंदाज) मध्ये 242.12 लाख टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे जे मागील वर्षीच्या 302.08 लाख टनाच्या तुलनेत सुमारे 60 लाख टनांनी कमी असेल.
* * *
S.Kane/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2022774)
Visitor Counter : 132