अर्थ मंत्रालय

मे 2024 मध्ये एकूण जीएसटी महसूल संकलन 1.73 लाख कोटी रुपये, गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% वाढ

Posted On: 01 JUN 2024 7:03PM by PIB Mumbai

 

 मे 2024 मध्ये एकूण वस्तू आणि सेवा कर (जीएसटी ) महसूल 1.73 लाख कोटी रुपये इतका होता.  ही आकडेवारी गेल्या वर्षीच्या तुलनेत  10% वाढ दर्शवते जी देशांतर्गत व्यवहारांमध्ये (15.3% अधिक ) आणि आयात मंदावल्याने (4.3% खाली) दिसून येत आहे.  परताव्याचा हिशेब दिल्यानंतर, मे 2024 चा निव्वळ वस्तू आणि सेवा कर महसूल 1.44 लाख कोटी रुपये इतका आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.9% नी अधिक आहे.

 मे 2024 मधील संकलनाचे वर्गीकरण  :

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST): 32,409 कोटी रुपये;

राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST): 40,265 कोटी रुपये;

एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST): 87,781 कोटी रुपये, ज्यात आयात केलेल्या वस्तूंवर जमा केलेल्या 39,879 कोटी रुपये संकलनाचा समावेश आहे;

उपकर: 12,284 कोटी रुपये, ज्यात आयात केलेल्या वस्तूंवर जमा केलेल्या 1,076 कोटी रुपये संकलनाचा समावेश आहे.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मे 2024 पर्यंत एकूण वस्तू आणि सेवा कर संकलन 3.83 लाख कोटी रुपये इतके होते. ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत  11.3% ची वाढ दर्शवते, जी देशांतर्गत व्यवहारांमध्ये (14.2% वर) आणि आयातीतील किरकोळ वाढ (1.4% वर) यामुळे झाली आहे. परताव्याचा लेखाजोखा केल्यानंतर, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मे 2024 पर्यंत निव्वळ वस्तू आणि सेवा कर महसूल 3.36 लाख कोटी रुपये इतका आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 11.6% ची वाढ दर्शवितो.

आर्थिक वर्ष 2024-25 मधील मे, 2024 पर्यंत संकलनाचे वर्गीकरण  खालीलप्रमाणे आहे:

केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (CGST): 76,255 कोटी रुपये;

राज्य वस्तू आणि सेवा कर (SGST): 93,804 कोटी रुपये;

एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (IGST): 1,87,404 कोटी रुपये ज्यात आयात केलेल्या वस्तूंवर गोळा केलेल्या 77,706 कोटी रुपये संकलनाचा समावेश आहे;

उपकर: 25,544 कोटी रुपये, ज्यात आयात केलेल्या वस्तूंवर जमा केलेल्या 2,084 कोटी रुपये  संकलनाचा समावेश आहे.

आंतर-सरकारी तडजोड :

मे 2024 मध्ये, केंद्र सरकारने 67,204 कोटी रुपये जमा केलेल्या निव्वळ एकात्मिक वस्तू आणि सेवा करातून केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने 38,519 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा कराच्या रुपाने 32,733 कोटी रुपये दिले. या नियमित परताव्यानंतर  मे, 2024 मध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या रूपाने 70,928 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा कराच्या रुपाने 72,999 कोटी रुपये एकूण महसुल जमा झाला. त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मे 2024 पर्यंत केंद्र सरकारने जमा केलेल्या 154,671 कोटी रुपये निव्वळ एकात्मिक वस्तू आणि सेवा करातून  केंद्रीय वस्तू आणि सेवा कराच्या रुपात 88,827 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा कराच्या रुपात 74,333 कोटी रुपये दिले. हे नियमित परताव्यानंतर, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, मे 2024 पर्यंत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर रुपात 1,65,081 कोटी रुपये आणि राज्य वस्तू आणि सेवा कर रुपात 1,68,137 कोटी रुपये एकूण महसुल जमा झाला.

State/UT

May-23

May-24

Growth (%)

Jammu and Kashmir

422

   525

24%

Himachal Pradesh

828

  838

1%

Punjab

1,744

  2,190

26%

Chandigarh

259

   237

-9%

Uttarakhand

1,431

  1,837

28%

Haryana

7,250

 9,289

28%

Delhi

5,147

7,512

46%

Rajasthan

3,924

  4,414

13%

Uttar Pradesh

7,468

  9,091

22%

Bihar

1,366

1,521

11%

Sikkim

334

   312

-7%

Arunachal Pradesh

120

     98

-18%

Nagaland

   52

     45

-14%

Manipur

   39

     58

48%

Mizoram

   38

     39

3%

Tripura

   75

     73

-3%

Meghalaya

 214

   172

-20%

Assam

 1,217

  1,228

1%

West Bengal

5,162

  5,377

4%

Jharkhand

2,584

 2,700

4%

Odisha

4,398

  5,027

14%

Chhattisgarh

2,525

  2,853

13%

Madhya Pradesh

3,381

 3,402

1%

Gujarat

 9,800

11,325

16%

Dadra and Nagar Haveli and Daman & Diu

324

   375

16%

Maharashtra

23,536

26,854

14%

Karnataka

 10,317

11,889

15%

Goa

523

   519

-1%

Lakshadweep

     2

1

-39%

Kerala

2,297

  2,594

13%

Tamil Nadu

8,953

  9,768

9%

Puducherry

202

  239

18%

Andaman and Nicobar Islands

   31

     37

18%

Telangana

4,507

 4,986

11%

Andhra Pradesh

3,373

 3,890

15%

Ladakh

   26

      15

-41%

Other Territory

201

  207

3%

Center Jurisdiction

 187

   245

30%

Grand Total

       1,14,261

1,31,783

15%

 

Pre-Settlement SGST

Post-Settlement SGST[2]

State/UT

May-23

May-24

Growth

May-23

May-24

Growth

Jammu and Kashmir

  178

 225

26%

  561

 659

17%

Himachal Pradesh

 189

  187

-1%

 435

 436

0%

Punjab

 638

 724

14%

1,604

1,740

8%

Chandigarh

48

 54

12%

 168

  178

6%

Uttarakhand

  411

 476

16%

 666

  714

7%

Haryana

 1,544

1,950

26%

2,568

3,025

18%

Delhi

 1,295

 1,477

14%

2,539

2,630

4%

Rajasthan

1,386

1,506

9%

3,020

 3,315

10%

Uttar Pradesh

2,384

2,736

15%

5,687

6,848

20%

Bihar

 623

 695

11%

2,058

2,298

12%

Sikkim

 31

26

-15%

84

66

-21%

Arunachal Pradesh

60

 45

-26%

  187

  152

-19%

Nagaland

 21

 19

-9%

83

 79

-4%

Manipur

23

32

35%

 77

 107

39%

Mizoram

 21

22

3%

 79

 77

-3%

Tripura

40

36

-9%

  135

 138

2%

Meghalaya

 56

 52

-7%

  158

  154

-3%

Assam

 488

  511

5%

 1,170

1,280

9%

West Bengal

 1,952

2,030

4%

3,407

3,628

6%

Jharkhand

 653

 735

13%

 976

 1,135

16%

Odisha

 1,255

 1,415

13%

 1,676

2,068

23%

Chhattisgarh

 583

 661

14%

 833

1,033

24%

Madhya Pradesh

 987

1,028

4%

2,580

 2,555

-1%

Gujarat

 3,371

3,526

5%

 5,156

5,233

2%

Dadra and Nagar Haveli and Daman and Diu

 47

 58

23%

92

80

-13%

Maharashtra

 7,621

 8,711

14%

10,952

12,397

13%

Karnataka

3,022

3,441

14%

5,704

6,062

6%

Goa

 182

 190

4%

 324

 321

-1%

Lakshadweep

   0

    1

478%

   7

   5

-35%

Kerala

1,040

1,209

16%

2,387

2,497

5%

Tamil Nadu

 3,101

3,530

14%

4,829

6,014

25%

Puducherry

36

 41

13%

99

 106

7%

Andaman and Nicobar Islands

 15

 18

17%

 41

44

5%

Telangana

1,448

1,636

13%

3,024

3,239

7%

Andhra Pradesh

1,048

1,240

18%

 2,116

2,597

23%

Ladakh

 14

   8

-43%

34

24

-27%

Other Territory

 16

 17

8%

83

66

-20%

Grand Total

35,828

40,265

12%

65,597

72,999

11%

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2022485) Visitor Counter : 78