आयुष मंत्रालय

आयुष मंत्रालयाने विमा कंपन्या आणि आयुष रुग्णालय मालकांसाठी आयोजित केला विशेष कार्यक्रम


आयुष विमा कवचाची व्याप्ती वाढवण्याच्या मार्गांवर भागधारकांनी केली चर्चा

Posted On: 27 MAY 2024 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 मे 2024

 

समाजाच्या टोकाशी असलेल्या  रुग्णांना देखील आयुष उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था (AIIA) येथे, आयुष मंत्रालयाने विमा कंपन्यांसाठी आणि आयुष रुग्णालयांच्या मालकांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात आरोग्य विमा योजनांमध्ये आयुष उपचारांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक नियामक आराखडा आणि धोरण समर्थन यावर चर्चा करण्यासाठी अनेक भागधारक एकत्र जमले होते.  

आयुष उपचारांना 01 एप्रिल 2024 पासून आरोग्य विमा संरक्षण अंतर्गत आणण्यासाठी विमा नियामक विकास प्राधिकरणाच्या (IRDAI) अलीकडील निर्देशांमुळे तसेच आयुष रुग्णालये, आरोग्य सेवा प्रदाते, विमा क्षेत्रातील भागधारक यांच्यात सखोल सामंजस्य  निर्माण करण्याची गरज याशिवाय नागरिकांना परवडणारी आयुष आरोग्य सेवा प्रदान करणे या कारणांसाठी ही बैठक आवश्यक होती.

“प्रत्येकाला आयुष उपचार सहज उपलब्ध व्हावेत हा यामागचा उद्देश आहे.” असे उपस्थितांना संबोधित करताना आयुष मंत्रालयाचे सचिव राजेश कोटेचा यांनी सांगितले.

“आम्ही आयुष उपचारांना मुख्य प्रवाहातील आरोग्य सेवा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात महत्त्वपूर्ण प्रगती करत आहोत, असे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या (AIIA) संचालक प्राध्यापक तनुजा नेसारी यांनी सांगितले. आमचे विमा कंपन्यांसोबतचे सहकार्य टीपीए नेटवर्कद्वारे आयुष सेवांमध्ये रोकडविरहीत सेवा सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करते, असेही त्या म्हणाल्या.  आजची बैठक ही या प्रवासातील एक महत्त्वाची पायरी आहे. यामुळे आयुष उपचार सर्वांसाठी सुलभ आणि परवडणारे बनवण्याच्या आमचे  ध्येय प्रत्यक्षात उतरण्याचे जवळ पोहचत आहोत”, असे त्यांनी सांगितले.

आयुष क्षेत्रातील विमा कवच, मानक उपचार मार्गदर्शक तत्त्वे आणि विमा क्षेत्रातील आयुषचा प्रवेश आणि रोहीणी व्यासपीठावर आयुष रुग्णालयांचे ऑनबोर्डिंग तसेच विमा संरक्षणासाठी सूचीमध्ये नाव समाविष्ट  करणे यासह विविध मुद्द्यांवर विमा क्षेत्र आणि आयुष रुग्णालये यातील अनेक भागधारकांनी त्यांचे दृष्टीकोन या कार्यक्रमात  मांडले.

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत (AB-PMJAY) आयुष उपचार पद्धतींचा समावेश करण्याच्या दिशेने आयुष मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण काम करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021866) Visitor Counter : 64


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil