कोळसा मंत्रालय

पेरू देशाच्या लिमा शहरात सुरू असलेल्या आयडब्ल्युएफ जागतिक युवा भारोत्तोलन स्पर्धेत जेएसएसपीएस च्या छात्राने पटकावली दोन कांस्य पदके

Posted On: 24 MAY 2024 4:55PM by PIB Mumbai

 

झारखंड स्टेट स्पोर्ट्स प्रमोशन सोसायटीचा  (JSSPS) छात्र असलेल्या बाबूलाल हेमब्रोमने आयडब्ल्युएफ जागतिक युवा भारोत्तोलन स्पर्धेत दोन कांस्य पदके पटकावली आहेत. पेरु मधील  लिमा सुरू असलेल्या स्पर्धेत बाबुलालने स्नॅच आणि क्लीन अँड जर्क प्रकारात 49 किलो वजनी गटात तिसरे स्थानही पटकावले.

Image

कोळसा खाणी असलेल्या राज्यांमध्ये क्रीडा सुविधांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून झारखंड स्टेट स्पोर्ट्स प्रमोशन सोसायटी (JSSPS) ला सेंट्रल कोल फिल्ड्स लिमिटेडने  सहाय्य  केले आहे. रांची येथील या प्रतिष्ठित संस्थेच्या परिसरात सुमारे 500 क्रीडापटू औपचारिक शिक्षणासोबत खेळांचेही प्रशिक्षण घेत आहेत.  बाबूलालचे हे यश सेंट्रल कोल फिल्ड्स आणि कोळसा मंत्रालयाच्या कोळसा खाणी असणाऱ्या राज्यांमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्या प्रयत्नांचे फलित आहे.  याशिवाय, कार्पोरेट सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत प्रत्येक 7 उपकंपन्यांमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्सअर्थात क्रीडा उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची कोळसा मंत्रालयाची योजना आहे.

Image

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021530) Visitor Counter : 54


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia , Tamil