उपराष्ट्रपती कार्यालय
बुद्ध पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला उपराष्ट्रपतींनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
22 MAY 2024 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2024
बुद्ध पौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.
भगवान गौतम बुद्धांची शिकवण नैतिक आचरण, मनाची शिस्त आणि ज्ञान या मूलतत्वांवर निष्ठा असलेले जीवन जगण्यासाठी एक परिवर्तनकारी मार्ग दर्शविते.
त्यांची चार महान सत्ये आणि अष्टांग मार्गाची शिकवण आपल्याला करुणा आणि अहिंसेच्या मार्गाने जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. वैयक्तिक आणि सामूहिक स्तरावर अधिक सहानुभूतीपूर्ण आणि सामंजस्यपूर्ण जीवन जगण्यासाठी सजगता आणि शांतता प्रस्थापित करण्याचे स्मरण ते आम्हाला करून देतात.
या पवित्र दिवशी, आपण भगवान बुद्धांच्या शाश्वत मूल्यांचा स्वीकार करण्याचा संकल्प करुया आणि सर्व मानवतेच्या कल्याणासाठी त्यांना आपल्या विचार आणि कृतीमध्ये समाविष्ट करुया.
बुद्ध पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन!
भगवान बुद्धांचे जीवन आपल्याला सत्य, करुणा, मैत्री आणि सदाचाराचा मार्ग दाखवते. त्यांची चार उदात्त सत्ये आणि अष्टांग मार्गाची तत्त्वे आपल्याला संवेदनशील आणि सामंजस्यपूर्ण समाज निर्माण करण्यास प्रेरित करतात.
या शुभ प्रसंगी, आपण मानवतेच्या कल्याणासाठी भगवान बुद्धांच्या शाश्वत मूल्यांचा अंगीकार करू या आणि त्यांना आपल्या विचार आणि कृतीत समाविष्ट करण्याचा संकल्प करूया
* * *
S.Patil/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2021370)