संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वायु सेनेच्या चंदीनगरमधील गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात मरून बेरेट प्रशिक्षणार्थींचे औपचारिक संचलन

Posted On: 18 MAY 2024 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 मे 2024 

 

भारतीय वायु सेनेच्या विशेष पथकाच्या ‘गरुड’ कमांडोजचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाल्यानिमित्त 18 मे 2024 रोजी चंदिनगर मधील वायु सेनेच्या तळावरील गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात (GRTC) मरून बेरेट हे औपचारिक संचलन आयोजित करण्यात आले होते. एअर मार्शल पीके वोहरा, वरिष्ठ हवाई कर्मचारी अधिकारी, वेस्टर्न एअर कमांड हे या संचलनाचे निरिक्षण अधिकारी होते.

गरुड प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल या अधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. सुरक्षेच्या बदलत्या परिस्थितीशी ताळमेळ साधण्यासाठी कठोर प्रशिक्षण आणि विशेष दलांच्या कौशल्यांचा सन्मान करण्यावर त्यांनी भर दिला. यशस्वी गरुड प्रशिक्षणार्थींना त्यांनी मरून बेरेट, गरुड प्रवीणता बॅज आणि स्पेशल फोर्स टॅब प्रदान केले तसेच गुणवंत प्रशिक्षणार्थींना चषक देखील प्रदान केले.  फ्लाइट लेफ्टनंट शाश्वत राणा यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू चषक प्रदान करण्यात आला.

  

समारंभाचा एक भाग म्हणून, गरुड प्रशिक्षणार्थींनी लढाऊ गोळीबार कौशल्य, ओलिस ठेवलेल्या लोकांची सुटका, फायरिंग ड्रिल, स्फोटक हल्ला, अडथळ्यांची कसरत, भिंतीवर चढाई, स्लिदरिंग, रॅपलिंग आणि लष्करी मार्शल आर्ट्सची प्रात्यक्षिके सादर केली.

मरून बेरेट औपचारिक संचलन ही एक महत्त्वपूर्ण घटना आहे जी अत्यंत कठीण असलेले प्रशिक्षण पूर्ण केल्याची दर्शक आहे. नुकतेच उत्तीर्ण झालेले हे प्रशिक्षणार्थी उच्च दर्जाच्या गरुड दलात प्रवेश करतील आणि भारतीय वायु सेनेची कार्यक्षमता वृद्धिंगत करतील.

 

* * *

M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2021034) Visitor Counter : 85


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil