वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

2024-25 या आर्थिक वर्षात व्यापारी माल आणि सेवांच्या एकूण निर्यातीचा एप्रिल 2023 मधील 60.40 अब्ज डॉलरच्या तुलनेत, अंदाजे 64.56 अब्ज डॉलर मूल्याच्या 6.88% भक्कम वृद्धीने प्रारंभ


एप्रिल 2024 मध्ये व्यापारी मालाच्या निर्यातवृद्धीला चालना देणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू, सेंद्रीय आणि बिगरसेंद्रीय रसायने, पेट्रोलियम उत्पादने आणि औषधे आणि फार्मास्युटिकल्सचा समावेश

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात एप्रिल 2023 मधील 2.11 अब्ज डॉलरच्या तुलनेत एप्रिल 2024 मध्ये 2.65 अब्ज डॉलर, 5.8% वाढ

Posted On: 15 MAY 2024 7:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 मे 2024

एप्रिल 2024* मध्ये भारताची एकूण निर्यात( व्यापारी माल आणि सेवा यांची एकत्रित)  64.56 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे. एप्रिल 2023 च्या तुलनेत निर्यातीत 6.88 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल 2024* मध्ये भारताची एकूण आयात( व्यापारी माल आणि सेवा यांची एकत्रित) 71.07 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे. एप्रिल 2023 च्या तुलनेत ही वाढ 12.78 टक्के आहे.

सारणी 1: एप्रिल 2024* मधील व्यापार

 

April 2024

(USD Billion)

April 2023

(USD Billion)

Merchandise

Exports

34.99

34.62

Imports

54.09

49.06

Services*

Exports

29.57

25.78

Imports

16.97

13.96

Total Trade

(Merchandise +Services) *

Exports

64.56

60.40

Imports

71.07

63.02

Trade Balance

-6.51

-2.62

टीप: आरबीआयने प्रसिद्ध केलेली सेवा क्षेत्राची ताजी आकडेवारी मार्च 2024 ची आहे. एप्रिल 2024 ची आकडेवारी हा एक अंदाज असून, आरबीआयच्या नंतरच्या प्रकाशनाच्या आधारे त्यात सुधारणा केली जाईल.

व्यापारी वस्तूंचा व्यापार

  • एप्रिल 2023 च्या 34.62 अब्ज डॉलरच्या तुलनेत एप्रिल 2024 मधील व्यापारी मालाची निर्यात 34.99 अब्ज डॉलर होती.
  • एप्रिल 2023 च्या 49.06 अब्ज डॉलरच्या तुलनेत एप्रिल 2024 मधील व्यापारी मालाची आयात 54.09 अब्ज डॉलर होती.

आकृती 2: एप्रिल 2024 मधील व्यापारी वस्तूंचा व्यापार

  • बिगर पेट्रोलियम आणि बिगर रत्ने आणि दागिन्यांची निर्यात एप्रिल 2023 मधील 25.77 अब्ज डॉलरच्या तुलनेत एप्रिल 2024 मध्ये 26.11अब्ज डॉलर होती.
  • बिगर पेट्रोलियम आणि बिगर रत्ने आणि दागिन्यांची( सोने, चांदी आणि मौल्यवान धातू) आयात एप्रिल 2023 मधील 32.13 अब्ज डॉलरच्या तुलनेत एप्रिल 2024 मध्ये 32.72अब्ज डॉलर होती.

सारणी 2: एप्रिल 2024 मध्ये पेट्रोलियम आणि रत्ने आणि आभूषणे वगळून व्यापार

April 2024

(USD Billion)

April 2023

(USD Billion)

Non- petroleum exports

28.37

28.20

Non- petroleum imports

37.63

35.36

Non-petroleum & Non Gems & Jewellery exports

26.11

25.77

Non-petroleum & Non Gems & Jewellery imports

32.72

32.13

टीप: रत्ने आणि आभूषणांच्या आयातीत सोने, चांदी आणि मोती आणि मौल्यवान आणि अर्ध-मौल्यवान खड्यांचा समावेश आहे.

आकृती 3: एप्रिल 2024 मध्ये पेट्रोलियम आणि रत्ने आणि आभूषणे वगळून व्यापार

सेवा व्यापार

  • एप्रिल 2023 मधील 25.78 अब्ज डॉलरच्या तुलनेत एप्रिल 2024* मध्ये सेवा निर्यातीचे अंदाजे मूल्य 29.57 अब्ज डॉलर आहे.
  • एप्रिल 2023 मधील 13.96 अब्ज डॉलरच्या तुलनेत एप्रिल 2024* मध्ये सेवा आयातीचे अंदाजे मूल्य 16.97 अब्ज डॉलर आहे.

आकृती 4: एप्रिल 2024* मधील सेवा व्यापार

  • व्यापारी मालाच्या निर्यातीमध्ये प्रमुख 30 क्षेत्रांपैकी 13 क्षेत्रांनी गेल्या वर्षाच्या(एप्रिल 2023) तुलनेत एप्रिल 2024 मध्ये सकारात्मक वृद्धीची नोंद केली आहे.     
  • व्यापारी मालाच्या आयातीमध्ये प्रमुख 30 क्षेत्रांपैकी 14 क्षेत्रांनी गेल्या वर्षाच्या(एप्रिल 2023) तुलनेत एप्रिल 2024 मध्ये नकारात्मक वृद्धीची नोंद केली आहे.
  • एप्रिल 2023च्या तुलनेत एप्रिल 2024 मध्ये सेवा निर्यातीत 14.68 टक्के दराने वाढ होण्याचा अंदाज आहे.

अंदाजांसाठी लिंक

N.Chitale/S.Patil/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2020714) Visitor Counter : 70


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil