संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलाच्या जहाजांनी मलेशियात कोटा किनाबालु इथे दिली भेट
Posted On:
12 MAY 2024 6:25PM by PIB Mumbai
भारतीय नौदलाच्या कार्यान्वयन तैनातीचा एक भाग म्हणून ईस्टर्न फ्लीटचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग रिअर अॅडमिरल राजेश धनखड यांच्या नेतृत्वाखाली दोन भारतीय नौदल जहाजे दिल्ली आणि शक्ती, मलेशियाच्या कोटा किनाबालु इथे पोहोचली आहेत. मलेशिया नौदल (रॉयल मलेशियन नेव्ही) आणि मलेशियातील भारतीय उच्चायुक्तांनी जहाजांचे स्वागत केले.
या जहाजांच्या या बंदरातील मुक्कामा दरम्यान, भारतीय आणि मलेशियाच्या नौदलाचे कर्मचारी, विषय सामग्री तज्ञ आदानप्रदान (SMEE) संबंधी सत्रे, योग, क्रीडा स्पर्धा आणि क्रॉस-डेक या एकमेकांच्या जहाजांना भेटी यासह विविध व्यावसायिक गाठीभेटीं मध्ये सहभागी होतील, ज्याचा उद्देश दोन नौदलांमध्ये असलेले विद्यमान परस्पर सहकार्य आणि सामंजस्य अधिक मजबूत करणे हा आहे.
भारतीय नौदलाची जहाजे, बंदराची भेट पूर्ण झाल्यावर, मलेशिया नौदलाच्या जहाजांसह समुद्रात सागरी भागीदारी सरावा (MPX)/PASSEX मध्ये देखील सहभागी होतील. नुकत्याच संपलेल्या MILAN 2024 आणि Ex Samudra Lakshmana 2024 या दोन उपक्रमांमध्ये उल्लेखिल्या प्रमाणे,दोन नौदलांमधील आंतरपरिचालन क्षमता वाढवणे हा यामागचा उद्देश आहे.
या भेटीमुळे दोन सागरी शेजारी देशांमधील दीर्घकालीन मैत्री आणि सहकार्य, विविध उपक्रमांच्या माध्यमातून आणखी दृढ होईल. या महत्त्वाच्या प्रदेशात भारतीय नौदलाच्या जहाजांची तैनाती, भारतीय नौदलाच्या 'ॲक्ट ईस्ट' अर्थात पूर्वेकडील देशांना प्राधान्य आणि भारत सरकारची SAGAR धोरणांप्रति दृढ वचनबद्धता अधोरेखित करते.
आय एन एस दिल्ली ही पहिली स्वदेशी रचनेची आणि बांधणीची प्रोजेक्ट-15 श्रेणीतील गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर म्हणजेच पथनिर्धारीत क्षेपणास्त्र विनाशिका आहे आणि आय एन एस शक्ती हे फ्लीट सपोर्ट म्हणजे ताफ्यातील पाठबळ पुरवणारे जहाज आहे. दोन्ही जहाजे भारतीय नौदलाच्या ईस्टर्न फ्लीटचा म्हणजे पूर्व ताफ्याचा भाग आहेत.
***
S.Kane/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2020394)
Visitor Counter : 87