कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कर्मयोगी भारत संस्थेच्या संचालक मंडळाची 12 वी बैठक मुंबईत संपन्न


संस्थेतील अभ्यासक्रमासाठी 1 कोटी व्यक्तींची नोंदणी आणि आयजीओटी कर्मयोगी मंचावर 1000 पेक्षा जास्त अभ्यासक्रमांची उपलब्धता असे दुहेरी यश साध्य केल्याची मंडळाने दिली माहिती

Posted On: 06 MAY 2024 9:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मे 2024

कर्मयोगी भारत संस्थेच्या संचालक मंडळाची 12 वी बैठक 03 मे 2024 रोजी मुंबई येथे पार पडली. रामदुराई सुब्रमणीयन यांनी या बैठकीचे अध्यक्षपद भूषवले.

संस्थेतर्फे शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी 1 कोटी व्यक्तींची नोंदणी आणि संस्थेतर्फे 1000 पेक्षा जास्त अभ्यासक्रम उपलब्ध करून देणे असे महत्त्वपूर्ण दुहेरी यश साध्य केल्याची माहिती मंडळाने या बैठकीत दिली. हे महत्त्वाचे टप्पे गाठल्यामुळे, सरकारी अधिकाऱ्यांमध्ये योग्यतेवर आधारित शिक्षणाची जोपासना करण्यात मंचाची अत्यंत महत्त्वाची भूमिका अधोरेखित होते असे मत मंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

बैठकीत उपस्थित सदस्यांनी आयजीओटी कर्मयोगी मंचाशी ई-एचआरएमएस मंचाच्या एकत्रीकरणाबद्दल प्रशंसा केली. या उपक्रमामुळे सरकारी अधिकाऱ्यांना त्यांच्या क्षमता आणि योग्यता यांच्यावर आधारित नेमणुका शक्य होऊन त्यातून भूमिकेवर आधारित प्रशासन पद्धती राबवता येणे शक्य होईल.

तालुका पातळी तसेच जिल्हा पातळीवरील क्षमता - निर्मिती उपक्रमांना चालना देण्यात एसएएमएआरटीएचतर्फे रचित कार्यक्रमांच्या महत्त्वावर अधिक भर देत, संचालक मंडळाने राज्य मंचाच्या उभारणीसाठी एनआयटीआयशी स्थापित केलेल्या सहयोगी संबंधांची देखील प्रशंसा केली.

संसदेत मंजूर झालेल्या – भारतीय न्याय संहिता, 2023; भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023; आणि भारतीय साक्ष्य अधिनियम, 2023 या तीन नव्या गुन्हेगारी कायद्यांच्या तसेच डिजिटल वैयक्तिक माहिती संरक्षण कायद्याच्या अभ्यासावर आधारित अभ्यासक्रमांची सुरुवात केल्याबद्दल सर्वांनी संस्थेचे कौतुक केले. लोकाभिमुख, नागरिक केंद्री प्रशासनात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना सर्वात वर्तमानकालीन समस्यांबाबत प्रशिक्षण देण्याबाबत कर्मयोगी भारत संस्थेच्या वचनबद्धतेचे यातून दर्शन घडते असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

महत्त्वाचे विकास कार्यक्रम परिणामकारकरित्या राबवण्यासाठी क्षेत्र अधिकाऱ्यांना सक्षम करण्याच्या उउदेशाने सुरु करण्यात आलेल्या जन कर्मयोगी उपक्रमाची देखील मंडळाने प्रशंसा केली. आयजीओटी मंचावरील ज्ञान कर्मयोगी या नागरी सेवा अधिकाऱ्यांसाठी व्यापक माहिती कोष म्हणून उपयुक्त ठरणाऱ्या उपक्रमाची मंचावरील स्वागतार्ह भर म्हणून दखल घेण्यात आली.

भविष्यातील वाटचालीचा विचार करत, मंडळाने मजकूरविषयक बाजारपेठेला सक्रीय करत तसेच शिक्षणाचे परिणाम सुधारण्यासाठी दर्जेदार मूल्यमापन आणि साहित्य उपलब्ध करून देत प्राधान्यक्रमाचे क्षेत्र म्हणून प्रभावाच्या मूल्यमापनावर लक्ष केंद्रित करण्याची पुन्हा एकदा ग्वाही दिली.

कर्मयोगी भारत संस्थेच्या संघनेत्यांनी यावेळी भविष्यासाठीच्या अधिक विस्तृत धोरणात्मक उद्दिष्टांबाबत वैयक्तिक सादरीकरणे देखील केली तसेच मंडळातील सदस्यांनी त्यांना त्याबाबत अभिप्राय दिले.

नियामाधारित प्रशासनाकडून भूमिका-आधारित प्रशासनाकडे स्थलांतर करण्यात परिवर्तनकारी भूमिका निभावण्यासाठीचे प्रयत्न दुप्पट करण्याची शपथ घेऊन या बैठकीचा समारोप करण्यात आला.

S.Patil/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019838)