संरक्षण मंत्रालय
दक्षिण नौदल कमांड आणि भारतीय नौदल अकादमीला जॉर्डन सशस्त्र दलाच्या प्रशिक्षण शिष्टमंडळाची पहिली भेट
प्रविष्टि तिथि:
06 MAY 2024 7:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मे 2024
कमांडर हाजेम अल मैताह यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय जॉर्डन सशस्त्र दलाच्या (JAF) प्रशिक्षण शिष्टमंडळाने 29 एप्रिल ते 04 मे 24 या कालावधीत सदर्न नेव्हल कमांड, कोची आणि इंडियन नेव्हल अकादमी, एझिमाला येथे भेट दिली. मार्च 2023 मध्ये, दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्यावरील दुसऱ्या सल्लागार बैठकीत ठरल्याप्रमाणे, लष्करी प्रशिक्षण देवाणघेवाण हा या पहिल्या भेटीचा उद्देश होता. शिष्टमंडळाने दक्षिण नौदल कमांड, कोची येथील व्यावसायिक प्रशिक्षण विद्यालयामधील विविध प्रशिक्षण सुविधांना भेट दिली. सिम्युलेटर्सची ओळख, व्यावसायिक संवाद आणि VBSS आणि डायव्हिंग ऑप्सचे प्रात्यक्षिक यांचा या भेटीतील ठळक बाबींमध्ये समावेश होता. या शिष्टमंडळासाठी स्वदेशी विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांत आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथील जहाज दुरुस्ती सुविधांचा मार्गदर्शक दौरा देखील आयोजित करण्यात आला होता. या शिष्टमंडळाने भारतीय नौदल आणि जॉर्डन सशस्त्र दल यांच्यातील नौदल प्रशिक्षण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील सहभागाच्या दृष्टीने कोमोडोर श्रीतनू गुरू, कोमोडोर प्रशिक्षण, सदर्न नेव्हल कमांड यांच्याशी संवाद साधला.
Q0JO.jpeg)
या शिष्टमंडळाने भारतीय नौदल अकादमीचे कमांडंट व्हाइस ॲडमिरल विनीत मॅकार्टी यांची भेट घेऊन प्रशिक्षण पद्धती, नेतृत्व धोरणे आणि मोहीमांच्या अनुभवांबद्दल अंतर्दृष्टी सामायिक केली. शिष्टमंडळातील सदस्यांना अकादमीच्या अत्याधुनिक प्रशिक्षण सुविधांची माहिती देण्यात आली तसेच त्यांच्याबरोबर सर्वोत्तम पद्धतींवर चर्चाही करण्यात आली. जॉर्डन सशस्त्र दल प्रशिक्षण शिष्टमंडळाचा दौरा दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याच्या व्यापक कक्षेत भारतीय नौदल आणि जॉर्डन सशस्त्र दलांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
* * *
N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2019772)
आगंतुक पटल : 90