भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय हवामान खात्याद्वारे मे 2024 च्या पहिल्या आठवड्यासाठी हवामानाचा अंदाज जाहीर


पुढील 5 दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये आणि 3 ते 5 मे दरम्यान मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

पुढील 5 दिवसांसाठी उष्णतेच्या लाटेचा, रात्रीही उकाड्याचा आणि उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा

Posted On: 01 MAY 2024 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 मे 2024

 

  • गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड, उत्तर ओडिशा आणि रायलसीमा येथे 03 मे पर्यंत कमाल तापमान 44 ते 47°C च्या आसपास राहण्याची आणि त्यानंतर कमी होण्याची शक्यता आहे.
  • गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी; ओडिशा, बिहारचा काही भाग; आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, झारखंडच्या तुरळक भागात 01-02 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेची किंवा उष्णतेच्या तीव्र लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असून त्यानंतरच्या 3 दिवसांत या प्रदेशातील तुरळक भागात उष्णतेच्या लाटेच्या स्थितीसह तीव्रता कमी होण्याचा अंदाज आहे.
  • पुढील 3 दिवसांत रायलसीमाच्या तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट ते तीव्र उष्णतेच्या लाटेची स्थिती आणि त्यानंतरच्या 2 दिवसांत उष्णतेच्या लाटेची परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
  • पुढील 4-5 दिवसांत तेलंगणा, कर्नाटकातील मध्यवर्ती भाग, किनारी आंध्र प्रदेश आणि याणम मधील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे; 1 आणि 2 मे रोजी केरळमध्ये आणि 1 ते 3 मे दरम्यान तामिळनाडू मधील तुरळक भागात उष्णतेच्या लाटेची दाट शक्यता आहे.
  • कोकण, मध्य महाराष्ट्र, गुजरात राज्यातील तुरळक भागात 1 ते 5 मे दरम्यान आणि मराठवाड्यातील तुरळक भागात 3 ते 5 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
  • पुढील 5 दिवस कर्नाटक आणि केरळ आणि माहे किनारपट्टीवर आणि 01 मे 2024 रोजी पश्चिम आसाममध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
  • छत्तीसगडमध्ये 01-03 तारखेदरम्यान; 3 ते 5 मे दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात; 01 आणि 02 मे 2024 रोजी ओडिशा आणि गंगेच्या खोऱ्यातील पश्चिम बंगालमध्ये रात्री उकाड्याची शक्यता आहे.

अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019353) Visitor Counter : 150