अर्थ मंत्रालय
(i) '7.33% सरकारी रोखे 2026', (ii) '7.23% सरकारी रोखे 2039' आणि (iii) '7.34% सरकारी रोखे 2064' ची विक्री (पुन्हा जारी) करण्याबाबतचे निवेदन
Posted On:
29 APR 2024 7:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2024
भारत सरकारने एकाधिक किंमत पद्धतीचा वापर करून मूल्य आधारित लिलावाद्वारे i) ₹6,000 कोटी (नाममात्र) अधिसूचित रकमेसाठी "7.33% सरकारी रोखे 2026", (ii) ₹ 10,000 कोटी (नाममात्र) अधिसूचित रकमेसाठी “7.23% सरकारी रोखे 2039”, आणि (iii) ₹12,000 कोटी (नाममात्र) अधिसूचित रकमेसाठी “7.34% सरकारी रोखे 2064” याची विक्री (पुन्हा जारी) करण्याची घोषणा केली आहे. भारत सरकारकडे वरील नमूद केलेल्या प्रत्येक रोख्यासाठी ₹ 2,000 कोटी पर्यंत अतिरिक्त सदस्यत्व कायम ठेवण्याचा पर्याय असेल. दिनांक 03 मे 2024 (शुक्रवार) रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मुंबईमधील फोर्ट येथील कार्यालयाद्वारे लिलाव आयोजित केले जातील.
सरकारी रोख्यांच्या लिलावात बिगर-स्पर्धात्मक बोली सुविधा योजनेनुसार पात्र व्यक्ती आणि संस्थाना रोख्यांच्या विक्रीच्या अधिसूचित रकमेच्या 5 टक्क्यांपर्यंतची रक्कम वितरित केली जाईल.
लिलावासाठी स्पर्धात्मक आणि बिगर-स्पर्धात्मक दोन्ही बोली भारतीय रिजर्व बँक कोर बैंकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) प्रणाली वर इलेक्ट्रॉनिक फॉरमॅट मध्ये 03 मे 2024 रोजी सादर होणे आवश्यक आहे. बिगर-स्पर्धात्मक बोली सकाळी 10:30 पासून 11:00 वाजेपर्यंत आणि स्पर्धात्मक बोली सकाळी 10:30 पासून 11:30 दरम्यान सादर व्हायला हवी.
लिलावांचे निकाल 03 मे, 2024 (शुक्रवार) रोजी घोषित केले जातील आणि यशस्वी बोलीदारांद्वारे भरणा 6 मे, 2024 (सोमवार) रोजी केला जाईल.
हे रोखे भारतीय रिझर्व्ह बँके द्वारा वेळोवेळी सुधारित परिपत्रक दिनांक 24 जुलै, 2018 च्या RBI/2018-19/25 अंतर्गत जारी मार्गदर्शक तत्वांनुसार “व्हेन इशूड” ट्रेडिंगसाठी पात्र असतील.
S.Kakade/R.Agashe/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019103)
Visitor Counter : 102