खाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

खाण मंत्रालयाकडून उद्यापासून दोन दिवसीय दुर्मिळ खनिजे परिषदेचे आयोजन

Posted On: 28 APR 2024 3:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 एप्रिल 2024

 

खाण मंत्रालय 29 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 दरम्यान नवी दिल्लीत लोधी इस्टेट इथे इंडिया हॅबिटॅट सेंटर मध्ये "दुर्मिळ खनिजे परिषद: लाभवृद्धी आणि क्षमता प्रक्रिया" आयोजित करणार आहे. 

दुर्मिळ खनिजे परिषद हा सहयोग वाढवण्यासाठी, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि दुर्मिळ खनिज लाभवृद्धी आणि प्रक्रियेच्या क्षेत्रात नावीन्य आणण्यासाठी बनवण्यात आलेला एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. भारताच्या जलद आर्थिक वाढ आणि महत्त्वाकांक्षी स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांच्या पार्श्वभूमीवर अक्षय ऊर्जा प्रणाली आणि इलेक्ट्रिक वाहनांसह प्रमुख तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ कच्च्या मालाचा देशांतर्गत पुरवठा सुनिश्चित करण्याची तातडीची गरज अधोरेखित करण्याच्या उद्देशाने ही शिखर परिषद आयोजित केली आहे. 

या शिखर परिषदेत प्रमुख उद्योजक, स्टार्टअप्स, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, शैक्षणिक आणि धोरण तज्ञांसह विविध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय संबंधितांना एकत्र येणार आहेत. यात सहभागी असणारे खनिज लिलावाची प्रगती, दुर्मिळ कच्चा माल  परिसंस्था विकासासाठी धोरणात्मक प्रोत्साहन आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ उपायांची प्रगती यासारख्या गंभीर मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या  सक्रिय चर्चा आणि परस्परसंवादी कार्यशाळेत सहभाग नोंदवणार आहेत.

परिषदेच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये पुढीलप्रमाणे आठ प्रमुख खनिजांवर आधारित तांत्रिक सत्रे समाविष्ट आहेत: ग्लॉकोनाइट (पोटॅश), लिथियम - दुर्मिळ भूघटक (लॅटेराइट), क्रोमियम, प्लॅटिनम गट, ग्रॅफाइट, ग्रॅफाइटशी संबंधित टंगस्टन, दुर्मिळ घटक (आरई), आणि ग्रॅफाइटशी संबंधित व्हॅनेडियम. ही सत्रे परस्पर आंतर व्यवसाय पूरक सहयोग आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी मौल्यवान संधी प्रदान करतील.

दुर्मिळ खनिजे परिषदेचे उद्दिष्ट सरकार आणि उद्योग भागधारकांना दुर्मिळ कच्च्या मालाच्या देशांतर्गत उत्पादनाला गती देण्यासाठी आवश्यक ज्ञान, संपर्कव्यवस्था आणि साधनांसह सुसज्ज करणे आहे, ज्यायोगे भारताच्या आर्थिक विकासाला आणि शाश्वततेच्या उद्दिष्टांना सहाय्य मिळेल.

 

* * *

N.Chitale/S. Naik/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019038) Visitor Counter : 127