ऊर्जा मंत्रालय

देशातील पहिल्या बहु-उद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन करत सतलज जल विद्युत निगमची महत्वपूर्ण कामगिरी

Posted On: 25 APR 2024 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 एप्रिल 2024

 

हिमाचल प्रदेशमध्ये झाकरी येथील नाथपा झाकरी जलविद्युत केंद्रात (एनजेएचपीएस) मध्ये 1,500 मेगावॅट क्षमतेच्या भारतातील पहिल्यावहिल्या बहु-उद्देशीय (उष्णता व विद्युत दोन्हींसाठी संयुक्त) हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन झाले असून, त्यायोगे एसजेव्हीएन लिमिटेड अर्थात सतलज जल विद्युत निगमने महत्वपूर्ण कामगिरी  केली  आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारा हरित हायड्रोजन, एनजेएचपीएस  मधील ज्वलन-इंधनाची गरज भागवण्यासाठी अतिवेगवान ऑक्सिजन इंधन आवरण सुविधेमध्ये वापरला जाणार आहे.

देशातील पहिल्या बहु-उद्देशीय (उष्णता व विद्युत दोन्हींसाठी संयुक्त) हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर यांच्या हस्ते 24 एप्रिल 2024 ला झाले. या प्रकल्पाबद्दल अध्यक्ष कपूर म्हणाल्या, "भारत सरकारच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाला अनुसरून एसजेव्हीएनचा हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्प, विद्युतक्षेत्रात हरित हायड्रोजन निर्मितीच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी निश्चितपणे सिद्ध झाला आहे. यामुळे हरित हायड्रोजन हा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत म्हणून प्रस्थापित केला जात आहे."

या अद्ययावत हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पातून रोजच्या 8 तासांच्या कार्यकाळात 14 किलो हरित हायड्रोजन निर्माण होण्याची व्यवस्था आहे.

वीजनिर्मिती खेरीज, टर्बाईनचे जे भाग पाण्याखाली असतात त्यांना अतिवेगवान ऑक्सिजन इंधन आवरण म्हणूनही हा हरित हायड्रोजन वापरला जाणार आहे.

 

* * *

N.Chitale/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2018869) Visitor Counter : 61