केंद्रीय लोकसेवा आयोग
केंद्रीय लोक सेवा आयोगाने जाहीर केले संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2023 चे अंतिम निकाल
Posted On:
22 APR 2024 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2024
केंद्रीय लोक सेवा आयोगाने सप्टेंबर 2023 मध्ये घेतलेली संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2023 आणि संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने 157 व्या (डीई) भारतीय लष्कर अकादमी, डेहराडून; भारतीय नौदल अकादमी, एळिमला, केरळ आणि वायू दल अकादमी, हैदराबाद (उड्डाणपूर्व) प्रशिक्षण अभ्यासक्रम अर्थात क्र. 216 एफ(पी) यांत प्रवेशासाठी घेतलेल्या मुलाखतींच्या निकालाधारे उत्तीर्ण झालेल्या 197 (143+39+15) उमेदवारांची गुणवत्ता याद्या पुढील प्रमाणे आहेत:
- काही उमेदवार विविध अभ्यासक्रमांच्या तिन्ही याद्यांमध्ये आहेत.
- या याद्या तयार करताना आरोग्य तपासणीचे निकाल लक्षात घेतलेले नाहीत.
- उमेदवारांची जन्म तारीख आणि शैक्षणिक योग्यतेच्या प्रमाणपत्रांची वैधता पडताळणी लष्कराच्या मुख्यालयात अद्याप सुरू आहे. त्यामुळे उमेदवारांची गुणांनुसार केलेली निवड सध्या तात्पुरती आहे.
- संपर्काच्या पत्त्यात काही बदल असेल तर उमेदवारांनी तो तातडीने लष्कर / नौदल / वायू दल मुख्यालयास थेट कळवावा.
- हे निकाल केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in या संकेतस्थळावरही उपलब्ध आहेत. मात्र, उमेदवारांचे गुण अधिकारी प्रशिक्षण अकादमी (ओ.टी.ए.) ने संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (II), 2023 चे अंतिम निकाल जाहीर केल्यानंतर संकेतस्थळावर जाहीर केले जातील.
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी केंद्रीय लोक सेवा आयोग कार्यालयाच्या ‘सी’ प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सुविधा केंद्राला प्रत्यक्ष भेट द्यावी अथवा 011-23385271/011-23381125/011-23098543 या दूरध्वनी क्रमांकांवर कार्यालयीन कामकाजाच्या कोणत्याही दिवशी सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 यावेळेत संपर्क साधावा.
संपूर्ण निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
* * *
S.Kane/R.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2018518)
Visitor Counter : 106