संरक्षण मंत्रालय
कट्टुपल्ली येथील मेसर्स एल अँड टी शिपयार्डमध्ये तिसऱ्या कॅडेट प्रशिक्षण जहाजाचे स्टील कटिंग
प्रविष्टि तिथि:
20 APR 2024 6:18PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्रालय आणि मेसर्स एल अँड टी यांच्यामध्ये मार्च 2023 मध्ये देशी बनावटीच्या तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांचे आरेखन आणि उभारणीसाठी करार करण्यात आला होता. यापैकी तिसऱ्या कॅडेट प्रशिक्षण जहाजाचा स्टील कटिंग समारंभ (यार्ड-18005) कट्टुपल्ली येथील मेसर्स एल अँड टी शिपयार्डमध्ये 20 एप्रिल 24 रोजी आयोजित करण्यात आला. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी या समारंभाचे अध्यक्षपद भूषवले. एल अँड टी प्रिसिजन इंजिनिअरिंग अँड सिस्टिम’चे कार्यकारी उपाध्यक्ष अरुण रामचंदानी तसेच भारतीय नौदल आणि मेसर्स एल अँड टी चे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
किनारपट्टीवर मूलभूत प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थी अधिकारी कॅडेट्सना समुद्रावरील प्रशिक्षण देण्यासाठी या कॅडेट प्रशिक्षण जहाजांचा वापर करण्यात येणार आहे. मित्र देशांच्या प्रशिक्षणार्थी कॅडेटना प्रशिक्षण देण्यासाठी देखील त्यांचा वापर होईल. सप्टेंबर 2026 मध्ये ही जहाजे भारतीय नौदलाच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. स्वदेशी बनावटीच्या जहाजांच्या बांधणीमध्ये भारतीय नौदलाचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा असेल आणि भारत सरकारचा आत्मनिर्भर भारत हा दृष्टीकोन आणि मेक इन इंडिया उपक्रम यांच्याशी तो सुसंगत असेल. लाँग टर्म इंटेग्रेटेड पर्स्पेक्टिव्ह प्लॅन (LTIPP 2012-27) भारतीय नौदलाला तीन कॅडेट प्रशिक्षण जहाजांचे बळ उपलब्ध करून देत आहे.
(3)YA0B.JPG)
***
M.Pange/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2018345)
आगंतुक पटल : 120