वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
सातत्याने जागतिक आव्हाने असूनही भारताची निर्यात (व्यापारी माल + सेवा) गेल्या वर्षीच्या सर्वोच्च निर्यातीचा विक्रम मोडण्याचा अंदाज. आर्थिक वर्ष 2022-23 मधील 776.40 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ही निर्यात 776.68 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज
आर्थिक वर्ष 2023-24च्या मार्च महिन्यात 41.68 अब्ज डॉलर्स इतक्या सर्वोच्च मासिक व्यापारी निर्यातीसह विद्यमान आर्थिक वर्षाचा समारोप
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये व्यापारी मालाच्या निर्यातीतील वाढीमध्ये मुख्यतः इलेक्ट्रॉनिक वस्तू, औषधे आणि फार्मास्युटिकल्स, अभियांत्रिकी वस्तू, लोह खनिज, कापसाचे धागे/फॅब्स./मेड-अप्स, हातमाग उत्पादने इत्यादी तसेच सिरामिक उत्पादने आणि काचेच्या वस्तू यांचा हातभार
आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 23.55 अब्ज डॉलर्स इतक्या मूल्याच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात झाली होती त्यात 23.64% वाढ होऊन आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ती 29.12 अब्ज डॉलर्सवर पोहोचली
औषधे आणि फार्मास्युटिकल्स यांची आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 25.39 अब्ज डॉलर्स इतक्या मूल्याची निर्यात 9.67% नी वाढून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 27.85 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तंबाखू, फळे आणि भाजीपाला, मांस, दुग्धोत्पन्न आणि पक्षीजन्य उत्पादने, मसाले, धान्यांपासून तयार झालेली उत्पादने आणि इतर प्रक्रियायुक्त उत्पादने, तेलबिया आणि ऑईल मील्स यांसारख्या कृषीआधारित उत्पादनांच्या निर्यातीत सकारात्मक वाढ
एकंदर व्यापारविषयक तूट 35.77%इतक्या लक्षणीय प्रमाणात सुधारली असून आर्थिक वर्ष 2022-23मध्ये ही तूट 121.62 अब्ज डॉलर्स होती ती आता आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 78.12 डॉलर्स इतकी कमी झाली
Posted On:
15 APR 2024 7:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2024
मार्च 2024 मध्ये भारताची एकंदर निर्यात (व्यापारी माल आणि सेवा अशा दोन्ही मिळून) 70.21 अब्ज डॉलर्स इतकी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.मार्च 2024 मधील एकंदर आयात 73.12 अब्ज डॉलर्स असेल असा अंदाज आहे.
Table 1: Trade during March 2024*
|
|
March 2024
(USD Billion)
|
March 2023
(USD Billion)
|
Merchandise
|
Exports
|
41.68
|
41.96
|
Imports
|
57.28
|
60.92
|
Services*
|
Exports
|
28.54
|
30.44
|
Imports
|
15.84
|
16.96
|
Overall Trade
(Merchandise +Services) *
|
Exports
|
70.21
|
72.40
|
Imports
|
73.12
|
77.88
|
Trade Balance
|
-2.91
|
-5.48
|
- आर्थिक वर्ष 2023-24 साठी (एप्रिल ते मार्च) व्यापारी मालाच्या निर्यातीअंतर्गत महत्त्वाच्या 30 क्षेत्रांपैकी 17 क्षेत्रांमध्ये, आर्थिक वर्ष 2022-23 च्या (एप्रिल ते मार्च) तुलनेत आर्थिक वर्ष 2023-24 दरम्यान (एप्रिल ते मार्च) सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली.यामध्ये लोह खनिज (117.74%), इलेक्ट्रॉनिक वस्तू(23.64%), तंबाखू (19.46%),सिरामिक उत्पादने आणि काचेच्या वस्तू (14.44%), फळे आणि भाजीपाला (13.86%), मांस, दुग्धोत्पन्न आणि पक्षीजन्य उत्पादने(12.34%), मसाले (12.3%), कॉफी(12.22%), औषधे आणि फार्मास्युटिकल(9.67%), धान्यांपासून तयार झालेली उत्पादने आणि इतर प्रक्रियायुक्त उत्पादने(8.96%), तेलबिया(7.43%), ऑईल मील्स(7.01%), हाताने तयार केलेले गालिचे वगळता इतर हस्तकलेच्या वस्तू(6.74%), कापसाचे धागे/फॅब्स./मेड-अप्स, हातमाग उत्पादने इत्यादी(6.71%), गालिचे(2.13%), अभियांत्रिकी वस्तू (2.13%) आणि चहा (1.05%).
- व्यापारी मालाच्या आयातीच्या बाबतीत महत्त्वाच्या 30 क्षेत्रांपैकी 16 क्षेत्रांमध्ये आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत (एप्रिल ते मार्च) आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये (एप्रिल ते मार्च) नकारात्मक वृद्धी दिसून आली. यामध्ये कच्चा आणि टाकाऊ कापूस, खते, गंधक आणि अनरोस्टेड लोह पायराईटस, वनस्पतीजन्य तेल, मोती आणि मौल्यवान स्टोन्स, कोळसा, कोक आणि ब्रीक्वेटस, इत्यादी, सेंद्रिय आणि अजैविक रसायने, वर्तमानपत्र, प्रकल्पसंबंधित वस्तू, पेट्रोलियम, चाछे आणि उत्पादने, वाहतूक साधने, वस्त्रांचे धागे, कापड, सौंदर्यप्रसाधने, लगदा आणि टाकाऊ कागद, लाकूड आणि लाकडाच्या वस्तू, चामडे आणि चामड्याच्या वस्तू, कृत्रिम राळ, प्लास्टिकच्या वस्तू इत्यांचा समावेश आहे.
- सेवांची निर्यात मात्र वर्ष 2022-23 (एप्रिल ते मार्च)च्या तुलनेत, आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते मार्च)मध्ये 4.39 टक्क्याची सकारात्मक वाढ दिसून आली आहे.
- भारताच्या व्यापारी तुटीत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये (एप्रिल ते मार्च)लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. भारताची एकंदर व्यापारी तूट आर्थिक वर्ष 2022-23 मधील (एप्रिल ते मार्च) 121.62 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 78.12 अब्ज डॉलर्स अंदाजित आहे. *जलद अंदाज मिळवण्यासाठी लिंक
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017985)
Visitor Counter : 205