संरक्षण मंत्रालय
वेलिंग्टन येथील डीएसएससी मध्ये 79 व्या कर्मचारी अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या अधिकाऱ्यांना लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले संबोधित
Posted On:
08 APR 2024 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 एप्रिल 2024
लष्करप्रमुख (सीओएएस) जनरल मनोज पांडे यांनी आज, 08 एप्रिल 2024 रोजी, वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयाला (डीएसएससी) भेट दिली. यावेळी लष्करप्रमुख पांडे यांनी डीएसएससी येथे 79 वी कर्मचारी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेले भारतीय लष्करातील अधिकारी तसेच मित्रराष्ट्रांतील अधिकारी तसेच तेथील कर्मचारी वर्गाला संबोधित केले.
उपस्थितांशी संवाद साधताना लष्करप्रमुख मनोज पांडे यांनी देशासमोरील असंख्य सुरक्षाविषयक आव्हाने तसेच भारतीय लष्करात करण्यात येत असलेल्या परिवर्तनात्मक सुधारणा यांची चर्चा केली. मनुष्यबळविषयक सुधारणांसह अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर असलेल्या पुनर्संतुलन आणि पुनर्रचनाविषयक सुधारणांवर त्यांनी विशेषत्वाने अधिक भर दिला.
देशाच्या सुरक्षा दलांतील सर्व अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानविषयक अत्याधुनिक घडामोडींबाबत तसेच युद्धाच्या बदलत्या स्वरूपाबाबत अद्ययावत राहण्याच्या गरजेबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. तिन्ही सैन्य दलांनी समन्वय तसेच संयुक्तता यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर त्यांनी यावेळी विशेष भर दिला.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2017471)
Visitor Counter : 70