संरक्षण मंत्रालय
नौदलप्रमुख ऍडमिरल आर हरी कुमार यांचे डीएसएससी वेलिंग्टन येथे 79 व्या स्टाफ कोर्सला उपस्थित भारतीय सशस्त्र दलांच्या भावी नेतृत्वाला मार्गदर्शन
Posted On:
29 MAR 2024 1:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 29 मार्च 2024
नौदलप्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार यांनी 28 मार्च 2024 रोजी डीएसएससी, वेलिंग्टनला भेट दिली आणि 79व्या स्टाफ कोर्सला उपस्थित असलेल्या भारतीय सशस्त्र दलाच्या भावी नेतृत्वाला मार्गदर्शन केले. यावेळी नौदलप्रमुखांनी भारताचा सागरी वारसा आणि हिंद महासागर क्षेत्रात सागरी सामर्थ्य म्हणून भारताच्या भौगोलिक स्थानाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी भारतीय नौदलाचे सदैव युद्धसज्ज असलेले, विश्वासार्ह, एकसंध आणि आत्मनिर्भर असलेले भविष्यासाठी सज्ज असलेले दल म्हणून झालेल्या परिवर्तनाकडेही लक्ष वेधले.
भारतीय नौदलाने अलीकडेच चाचेगिरीविरोधी मोहिमांसह राबवलेल्या इतर मोहिमांची ऍडमिरल आर हरीकुमार यांनी माहिती दिली. भारताचा व्यापार आणि इतर सागरी हितसंबंध यांचे रक्षण करण्यामध्ये भारतीय नौदलाने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर देखील त्यांनी भर दिला. राष्ट्रीय लष्करी उद्दिष्टे साध्य करण्यामध्ये सशस्त्र दलांचा एकत्रितपणा आणि एकात्मिकरण यांचे महत्त्वदेखील त्यांनी अधोरेखित केले.
I1X5.jpeg)
YNOZ.jpeg)
L7VB.jpeg)
S.Tupe/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2016635)
Visitor Counter : 101