कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

कंबोडियातील सनदी सेवा अधिकाऱ्यांसाठी ‘सार्वजनिक धोरण आणि प्रशासन’ या विषयावरील दोन सप्ताहांचे चौथे प्रशिक्षण अभियान राष्ट्रीय सुप्रशासन केंद्रात सुरू


एनसीजीजी इथे एकूण 156 कंबोडियन सनदी सेवा अधिकाऱ्यांची क्षमता बांधणी कार्यक्रमात उपस्थिती

Posted On: 28 MAR 2024 8:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 28 मार्च 2024

कंबोडियातील सनदी अधिकाऱ्यांसाठी ‘सार्वजनिक धोरण आणि प्रशासन’ या विषयावरील दोन आठवड्यांचा  प्रशिक्षण कार्यक्रम आजपासून मसूरी इथल्या राष्ट्रीय सुशासन केंद्रात सुरू झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या भागीदारीतून, 26 मार्च ते 6 एप्रिल 2024 या काळात हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

कंबोडियातील 39 अधिकारी, जे  तपास आणि शिक्षण मंत्रालय, युवा आणि क्रीडा मंत्रालयात मुख्य अधिकारी, संचालक, उपसंचालक, अशा पदांवर कार्यरत आहेत, ते मसूरी आणि नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

या कार्यक्रमाला एनसीजीजीचे महासंचालक आणि प्रशासकीय सुधारणा तसेच सार्वजनिक तक्रार विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास उपस्थित होते. यावेळी त्यांनी दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंध आणि त्यांच्या संस्कृतींमधील साम्य, यावर आपले विचार मांडले.  नागरिकांसाठी अधिक चांगली धोरणे तयार करणे, सेवा प्रदान करणे, संस्थांमध्ये परिवर्तन घडवून आणणे आणि नागरिकांना सरकारच्या जवळ आणणे सुनिश्चित करण्यासाठी, भारतात डिजिटल तंत्रज्ञानाचा कसा अवलंब केला गेला आहे हे अधोरेखित करणाऱ्या भारताच्या शासन पद्धतीबद्दलही त्यांनी सविस्तर माहिती दिली.

यावेळी श्रीनिवासन म्हणाले, संस्थांच्या कारभारात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यावे तसेच त्याद्वारे सुप्रशासन सुनिश्चित व्हावे, यासाठी संस्थांचे डिजिटलीकरण आवश्यक आहे डीएआरपीजी, एनईएसडीए आणि खेलो इंडिया कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक तक्रार निवारण यंत्रणा, निवृत्तीवेतन कल्याण यावर त्यांनी माहिती दिली. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना समूहांमध्ये काम करण्यास आणि हाती घेतलेल्या प्रमुख धोरणांवर आणि कार्यक्रमांवर सादरीकरण करण्यास प्रोत्साहन दिले.

‘राष्ट्रीय सुशासन केंद्र’ भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागांतर्गत येणारी एक स्वायत्त संस्था आहे. एनसीजीजीने आतापर्यंत, परराष्ट्र मंत्रालयाच्या भागीदारीत 17 देशांच्या नागरी सेवा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यात, बांगलादेश, केनिया, टांझानिया, ट्युनिशिया, सेशेल्स, गांबिया, मालदीव, श्रीलंका, अफगाणिस्तान, लाओस, व्हिएतनाम, नेपाळ, भूतान, म्यानमार, इथिओपिया, एरेट्रिया आणि कंबोडिया या देशांचा समावेश आहे.

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2016598) Visitor Counter : 50


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil