आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण
गिफ्ट आयएफएससीचा “जागतिक वित्तीय आणि लेखा केंद्र” म्हणून विकास करण्यासाठी स्थापन तज्ञ समितीने आपला अहवाल आयएफएससीए ला केला सादर
Posted On:
28 MAR 2024 5:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 28 मार्च 2024
गुजरात आंतरराष्ट्रीय वित्तीय तंत्रज्ञान- सिटी, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (गिफ्ट आयएफएससी) चा विकास ‘जागतिक वित्तीय आणि लेखा केंद्र’ म्हणून करण्यासाठी नियुक्त समितीने आपला अहवाल, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (आयएफएससीए) च्या अध्यक्षांना 26 मार्च 2024 रोजी सादर केला.
वित्त मंत्रालयाने 18 जानेवारी 2024 रोजी वित्त मंत्रालयाने या समितीच्या नियुक्तीसंदर्भात अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेत, आयएफएससीए कायदा, 2019 च्या कलम 3(1)( e)(xiv) अंतर्गत, बुक कीपिंग, लेखा, कररचना आणि वित्तीय गुन्हे अनुपालन अधिसूचित करण्यात आले होते. ही तज्ञ समिती, आयसीएआय म्हणजेच, भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत उद्योग जगत, अभ्यासक आणि सरकारमधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
या समितीने, भारतात आयएफएससीच्या बुक कीपिंग, लेखापरीक्षण, कररचना आणि वित्तीय गुन्हे अनुपालन सेवा या सगळ्यासाठी एक व्यापक नियामक व्यवस्था असावी, अशी शिफारस केली आहे. त्याशिवाय, या समितीने, गिफ्ट आयएफएससी ला प्रोत्साहन देत त्याचा आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून विकास करण्यासाठी, इतर अनेक शिफारसी केल्या आहेत. यात, मनुष्यबळाची कौशल्ये आणि कार्यक्षमता वाढवण्याचीही शिफारस आहे.
आपल्या अहवालात, या समितीने, बुक कीपिंग, लेखा, कररचना आणि वित्तीय गुन्हे अनुपालन सेवा, अशा सेवांचे जागतिक केंद्र बनण्याच्या गिफ्ट आयएसएससी च्या क्षमता अधोरेखित केल्या आहेत. हे जागतिक वित्तीय केंद्र झाल्यास, इथे कुशल आणि गुणवान मनुष्यबळासाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होऊ शकतील.
तज्ञ समितीचा संपूर्ण अहवाल, आयएफएससीए च्या संकेतस्थळावर बघता येईल. त्याची लिंक :-
https://ifsca.gov.in/ReportPublication/index/aadg9ruDI%20M=
S.Kane/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2016580)
Visitor Counter : 98