संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) बांधला लडाख मधील निम्मू-पदम-दारचा यांना जोडणारा सामरिकदृष्ट्या महत्वाचा रस्ता

प्रविष्टि तिथि: 26 MAR 2024 10:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 26 मार्च 2024

सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) 25 मार्च 2024 रोजी लडाखमधील निम्मू-पदम-दारचा या ठिकाणांना जोडणाऱ्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले. हा 298 किमी लांबीचा रस्ता कारगिल-लेह महामार्गावरील दारचा आणि निम्मू मार्गे मनाली आणि लेह या शहरांना जोडेल. हा रस्ता आता मनाली-लेह आणि श्रीनगर-लेह या मार्गांव्यतिरिक्त, लडाखला देशाच्या इतर भागाशी जोडणारा तिसरा मार्ग ठरेल.

निम्मू-पदम-दारचा हा रस्ता इतर दोन मार्गांच्या तुलनेत केवळ कमी लांबीचा नाही, तर या रस्त्यावर प्रवास करताना शिंकुन-ला (16,558 फूट उंचीवरील) ही एकच खिंड ओलांडावी लागेल, आणि बीआरओ, या ठिकाणी बोगद्याचे काम सुरु करणार आहे. त्यामुळे सर्व ऋतुंमध्ये लडाखला जोडणारा रस्ता उपलब्ध होईल. या दळणवळण सुविधेमुळे संरक्षण सज्जतेला बळ मिळेल आणि  झन्स्कार खोऱ्यातील आर्थिक विकासाला चालना मिळेल.

जानेवारी महिन्यात जेव्हा झन्स्कार नदी गोठली होती, त्यावेळी उपकरणे आणि कामगारांना एकत्र आणून रस्ते जोडणीचे काम पूर्ण करण्यात आल्याचे बीआरओ चे डीजी  लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन यांनी सांगितले. या रस्त्याचे डांबरीकरण लवकरच सुरु होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंकुन-ला बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर लडाखला सर्व ऋतुंमध्ये जोडणारा तिसरा मार्ग उपलब्ध होईल.  

 

 

 

 

R.Aghor/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2016419) आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali