अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निवडणुक काळात होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी,आयकर विभागाच्या, पुणे शाखेने 24x7 कार्यरत असणारा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.


नागरिक त्यांच्या तक्रारी किंवा फोन कॉल, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे नोंदवून या कक्षाला माहिती देऊ शकतात

प्रविष्टि तिथि: 19 MAR 2024 10:16AM by PIB Mumbai

लोकसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया संपूर्ण देशात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आयकर विभागाने निवडणुकांच्या काळात  होणाऱ्या पैशांच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष दिवसाचे 24 तास, आठवड्याचे सातही दिवस (24x7) कार्यरत असेल.

या कक्षात नागरिक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा पैशांच्या गैरवापराची माहिती देऊ शकतात. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली,सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर,या  जिल्ह्यांसाठी 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये होणाऱ्या पैशांच्या अधिकाराच्या गैरवापराशी संबंधित माहिती / तक्रारी देण्यासाठी पुढील संपर्क क्रमांक, ईमेल किंवा पत्ता वापरला जाऊ शकतो.

 

टोल फ्री क्रमांक : 1800-233-0353 

टोल फ्री क्रमांक : 1800-233-0354

व्हॉट्सॲप क्रमांक : 9420244984

ईमेल आयडी : pune.pdit.inv@incometax.gov.in

नियंत्रण कक्षाचा पत्ता : रूम क्र. 829, 8वा मजला, आयकर सदन, बोधी टॉवर, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पुणे 411037.

 

यामुळे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत काळ्या पैशाच्या गैरवापरावर लक्ष ठेवण्यास आणि त्यावर अंकुश ठेवण्यासाठी आयकर विभागाला मदत होईल.

***

NM/SampadaP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2015489) आगंतुक पटल : 320
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Punjabi , Malayalam