संरक्षण मंत्रालय
स्टेशन कमांडर कार्यशाळा
Posted On:
17 MAR 2024 6:24PM by PIB Mumbai
भारतीय नौदलांच्या स्टेशन कमांडर्सच्या तिसऱ्या कार्यशाळेचे 18-20 मार्च 2024 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत आयएनएस हमला(दक्षिणी नौदल कमांड) आणि आयएनएस सरकार्स( पूर्व नौदल कमांड) येथे अशा प्रकारच्या दोन कार्यशाळांचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता नवी दिल्लीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, ज्या ठिकाणी 100 स्टेशन कमांडर्स, युनिट प्रमुख आणि कमांडिंग अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटे या द्वीप क्षेत्रांसह संपूर्ण देशभरात असलेल्या सर्व नाविक तळांवरील एकंदर प्रशासनात सुधारणा करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण संकल्पनांची देवाणघेवाण आणि विचारमंथन करण्यात येईल. नेव्हल वेल्फेअर अँड वेलनेस असोसिएशन(NWWA)च्या सहभागासह एनएचक्यू कर्मचारी, मुख्यालय कमांड कर्मचारी, आणि स्टेशन कमांडर्स यांच्याकडून या कार्यशाळेत होणारी व्यावसायिक सादरीकरणे यांचा या कार्यशाळेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये समावेश आहे. भारतीय नौदलाच्या अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर्स(EICs) विषयी एक विशेष सत्र आयोजित करण्यात येईल. शून्य ते 6 या वयोगटातील बालकांच्या सुरुवातीच्या टप्प्यातील विकासामधील समस्या वेळेवर विचारात घेण्याचे काम एनडब्लूडब्लूएचा उपक्रम असलेल्या ईआयसीकडून केले जाते. त्यामुळे अगदी लहान वयातच व्यावसायिक उपाययोजना उपलब्ध केल्यामुळे या बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट करणे शक्य होते. सर्व तिन्ही कमांड केंद्रे, दिल्ली आणि कारवार येथे ही ईआयसी उपलब्ध आहेत. कार्मिक सेवा नियंत्रक(CPS) वाईस ऍडमिरल गुरचरण सिंग या बैठकीचे अध्यक्षपद भूषवतील तर नौदल प्रमुख ऍडमिरल हरी कुमार समारोपाचे भाषण करतील.
भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या (आयएसएलआरटीसी) विद्यार्थ्यांच्या सांकेतिक भाषेतील राष्ट्रगीताच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
***
S.Kane/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015334)
Visitor Counter : 104