गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीवर (सीपीजीआरएएमएस) सार्वजनिक तक्रारींचे वेळेवर निवारण सुनिश्चित करण्यासाठी गृहमंत्रालय वचनबद्ध
Posted On:
15 MAR 2024 8:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृह मंत्रालय केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीवर (सीपीजीआरएएमएस सार्वजनिक तक्रारींचे वेळेवर निराकरण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.
तक्रार निवारण मूल्यांकन आणि निर्देशांकच्या (जीआरएआय) सर्व 15 निर्देशकांमध्ये उत्तम कामगिरी करत तक्रार निवारण मूल्यमापन निर्देशांकामध्ये (जीआरएआय) गृह मंत्रालयाने 2023-24 या कालावधीत अव्वल 10 मंत्रालयांमध्ये सातत्याने स्थान मिळवले आहे. 2023-24 मध्ये गृह मंत्रालयाने 48,837 सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करून 30 दिवसांच्या तुलनेत 8 दिवसांच्या सरासरी वेळेसह उत्कृष्ट कामगिरी केली आहे.केवळ 10 टक्के तक्रारीं अपीलांमध्ये गेल्या. हे प्रमाण सर्व मंत्रालयांमध्ये सर्वात कमी आहे. 40% नागरिक समाधानी आहेत. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार गृहमंत्रालयाची कामगिरी इतर मंत्रालये/विभागांसाठी मापदंड म्हणून काम करेल.
* * *
S.Kane/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015092)
Visitor Counter : 89