राष्ट्रपती कार्यालय
भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
Posted On:
15 MAR 2024 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 मार्च 2024
भूतानचे पंतप्रधान महामहिम दाशो शेरिंग तोबगे यांनी आज (15 मार्च, 2024) राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
भूतानच्या पंतप्रधानांनी शपथ ग्रहण केल्यानंतर आपल्या पहिल्या परराष्ट्र दौऱ्यासाठी भारताची निवड केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांचे स्वागत केले. भारत आणि भूतान यांच्यात सर्व स्तरांवर परस्पर विश्वास, सामंजस्य आणि सद्भावना यांवर आधारित घनिष्ठ आणि अनोखे मैत्रीपूर्ण संबंध आहेत, बौद्ध धर्माचा आध्यात्मिक वारसा हा दोन्ही देशांना जोडणारा धागा आहे, असे राष्ट्रपती म्हणाल्या. ऊर्जा सहकार्य, विकासात्मक भागीदारी, नागरिकांमधील संबंध, व्यापार आणि गुंतवणूक अशा विविध पैलूंमध्ये विस्तारलेली भारत आणि भूतान यांच्यातील बहुआयामी भागीदारी भारतासाठी महत्वाची आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.
भूतान भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून बघू शकतो. भूतानमधील लोकांचे सामाजिक आणि आर्थिक कल्याण वृद्धिंगत करणे आणि त्यांच्या समृद्धीसाठी भूतान सोबत विकासात्मक सहकार्य क्षेत्रात कार्य करणे हे भारत आपले भाग्य समजतो, असे राष्ट्रपती म्हणाल्या. भारताची विकासात्मक भागीदारी भूतानच्या विशेषतः तेथील युवा वर्गाच्या दृष्टीने आकांक्षा आणि प्राधान्यक्रमानुसार इथून पुढेही कायम असेल, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
* * *
S.Kane/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2014919)